एक्स्प्लोर

Vastu Tips : सावधान! घरात चुकीच्या दिशेला डस्टबिन ठेवाल तर वेळीच व्हाल कंगाल; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशा

Vastu Tips For Money : वास्तू शास्त्रात डस्टबिनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर धनहानी देखील होण्याची शक्यता असते.

Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार (Vastu Shastra), प्रत्येक दिशेची एक वेगळी ऊर्जा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूची देखील विशेष ऊर्जा असते. जर, एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्याचप्रमाणे कचरा टाकण्यासाठी वापरली जाणारी डस्टबिन ही देखील प्रत्येक घरात आढळणारी महत्त्वाची वस्तू आहे. पण, जर हीच डस्टबिन तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्याचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. 

वास्तू शास्त्रात डस्टबिनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर धनहानी देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे या नियमां संदर्भात वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊयात. 

'या' दिशेला डस्टबिन कधीही ठेवू नका 

वास्तू शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवली तर देवी लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, वास्तू शास्त्रानुसार, कधीही घरातील डस्टबिनला उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका. घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवलेली डस्टबिन तुमच्या आयुष्यात तणाव, अशांतता पसरविण्याचं काम करते. यामुळे घरातील व्यक्ती नेहमी तणावात असतात. 

तसेच, घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला डस्टबिन ठेवल्यास धनहानी होते. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. तर, घरातील पैसा पाण्यासारखा वाहत जातो. कर्जाचा डोंगर वाढतो. घरातील सदस्यांच्या नोकरी-व्यवसायात प्रगती होत नाही. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. 

घराच्या 'या' दिशेला ठेवा डस्टबिन 

वास्तू शास्त्रानुसार, घरातील डस्टबिनला नेहमी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणं योग्य आहे. याचं कारण म्हणजे, घराची दक्षिण-पश्चिम दिशा विसर्जन करण्यासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेला डस्टबिन ठेवू शकता. 

'या' दिशेला डस्टबिन ठेवू नका 

  • घरातील कचऱ्याला कधीही घराच्या बाहेर ठेवू नका. विशेषत: घराच्या मुख्य द्वाराजवळ कधीही डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका. 
  • तसेच, किचन, पूजा घर आणि बेडरुममध्ये देखील डस्टबिन ठेवू नका. 
  • घरातील तिजोरीजवळ, तुळशीच्या रोपाजवळ कधीच डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Ast 2026 : शनि-मंगळ-बुध ग्रह एकापाठोपाठ होणार अस्त! 'या' 3 राशींसाठी सर्वात कठीण काळ सुरु, उरले अवघे 24 तास...

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
Jagannath Puri Yatra 2026: अविवाहित जोडपं भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी एकत्र का जात नाहीत? यामागील श्रद्धा, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल...
अविवाहित जोडपं भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी एकत्र का जात नाहीत? यामागील श्रद्धा, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल...
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Embed widget