Shani Dev: शनिची पिडा घालवण्यासाठी शनिवारी करा 'हे' उपाय; प्रत्येक समस्या होईल दूर
Shani Dev: शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात, यासाठी शनिवारी करायचे काही उपाय जाणून घेऊया.
Shanivaar Upay : शनि पूजेसाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाला (Shani Dev) आवडणारं काम करून शनिदेवाला प्रसन्न करता येतं. कुंडलीत शनि कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत शनिदेवाशी संबंधित काही उपाय (Shaniwar Upay) केल्यास शुभफल प्राप्त होते.
शनिवारचे उपाय केल्याने ज्या लोकांच्या आयुष्यात समस्या येत आहेत, त्यांच्या समस्या संपतात आणि चांगल्या गोष्टी होऊ लागतात. शनिदेवाचे कोणते उपाय आहेत, जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील? जाणून घेऊया.
शनिवारचे उपाय (Shaniwar Upay)
दान करा (Daan)
शनिवारी दान-पुण्याशी संबंधित काम करा, असं केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी गरजू लोकांना आवश्यक वस्तू दान करा. तसंच, शनिवारी काळी उडीद डाळ, काळे तीळ आणि काळा हरभरा दान करणं खूप शुभ मानलं जातं.
शनि मंत्र (Shani Mantra)
शनीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत, ज्यामध्ये शनिच्या मंत्रांचं विशेष महत्त्व आहे. शनिवारी शनि मंत्राचा जप अवश्य करावा. असं मानलं जातं की, शनिवारी शनि मंत्राचा जप केल्याने पैसा, व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती दूर होते. तुमच्या घरात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
शनिदेवाशी संबंधित काही खास मंत्रांबद्दल जाणून घेऊया
ओम शाम शनिश्चराय नम:
शनिदेवाच्या नामस्मरणाचा वैदिक मंत्र
ऊँ शन्नो देवी अभिष्टदाआपो भवन्तु पिताये ।
कुत्र्यांची सेवा
शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी तुम्ही काळ्या कुत्र्याची किंवा कोणत्याही कुत्र्याची सेवा करून शनिदेवाला प्रसन्न करू शकता. कुत्र्यांची सेवा करणार्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात आणि अशा लोकांवर त्यांचा विशेष आशीर्वाद राहतो.
कुंडलीतील शनीची स्थिती सुधारण्यासाठी हे उपाय करा
शनीला शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यामध्ये शनिवारी उपवास, हनुमानाची पूजा, शनि मंत्र, शनि यंत्र हे प्रमुख उपाय आहेत. दर शनिवारी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा करा, असं केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. शनि हा कर्म भावाचा स्वामी आहे, त्यामुळे शनीचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी नेहमी चांगलं कर्म करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव