Shani Dev: शनिची कृपा असेल तर आणि काय हवं? पौष अमावस्येला 'करा' हे उपाय; घरात कधीच भासणार नाही पैशांची चणचण
Amavasya 2024: पौष अमावस्येला सहज उपाय करून पितरांना प्रसन्न करता येते. षौष अमावस्येला शनि देवाला देखील प्रसन्न करता.
Paush Amavasya: हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. या महिन्यातील 9 फेब्रुवारीला आहे. पौष महिन्याची अमावस्या ( Amavasya 2024) खूप खास आहे. या अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हटले जाते. पौष अमावस्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. पूर्वज शांत-समाधानी असतील तर कुटुंबात सुख-शांती नांदते. घरातील लोकांची प्रगती होत राहते. जर पूर्वज कोणत्याही कारणाने नाराज असतील तर त्यामुळे कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं. पौष अमावस्येला सहज उपाय करून पितरांना प्रसन्न करता येते. षौष अमावस्येला शनि देवाला देखील प्रसन्न करता.
कोणतेही काम करताना अडचण येत असेल किंवा कम पूर्ण होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या राशीवर शनि देवाची वक्रदृष्टी पडली आहे. हा तुमच्यासाठी सोप्या भाषेत सांगायचे तर कठीण परीक्षेचा काळ असतो. शनिच्या प्रकोपासून वाचायचे असेल तर तुम्ही काही सोप्या उपायांनी शनि देवाला प्रसन्न करू शकतात. पौष अमावस्येला जर हे उपाय केले तर शनिची तुमच्यावर कृपा होईल आणि शनिदेवाच्य प्रकोपातून तुमची मुक्तता होईल.
शनि देवाला प्रसन्न करण्याचे उपाय (How To Please Shani Dev)
- अमावस्या शनि देवाला प्रसन्न करण्यासठी उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पुजा केली पाहिजे.
- अमावस्येच्या दिवळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. पाणी घालताना ऊं शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा
- पौष अमावस्येला शनि मंदिरात जावे. शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळ तीळ अर्पण करावे. शनिदेवाच्या कोपावर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.
- पौष अमावस्येला काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचे दान करावे.
- पौष अमावस्येला चुकूनही मांसाहर आणि मद्यापान करु नका
- जर तुमच्या घराजवळ शमीचे झाड असेल तर त्या झाडाला पाणी, मोहरीचे तेल, काळे तीळ, गुळ अर्पण करून त्याची पुजा करवी
- पौष अमावस्येल उडीद, लोखंड, तेल, तीळ आणि काळे कपड्यांचे दान याचे विशेष महत्त्व आहे
- अमवस्येला घरी शनि यंत्र घरी आणल्याने घरात सुख, समृद्धी, शांती नांदेल
- शनिची आपल्यावर कायम कृपा राहावी यासाठी सात मुखी रुद्राक्ष धारण करणे अतिशय लाभदायक आहे,
- शनिदेव भगवान शंकराला आपले गुरू मानतात. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर तिळाचे पाणी अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :