Shani Dev : शनि अस्त होताच 3 राशींचे भाग्य उजळवेल, मेहनतीचे फळ देईल, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या
Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. या वर्षी शनि कुंभ राशीत अस्त करेल आणि काही राशींना फायदा होईल. जाणून घेऊया या राशींबद्दल.
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायाची देवता म्हटले जाते. तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. शनी सध्या कुंभ राशीत आहे, पण फेब्रुवारी महिन्यात शनीची चाल बदलणार आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी शनि अस्त होईल, 18 मार्च 2024 पर्यंत याच स्थितीत राहील. शनीच्या अस्तामुळे काही राशींच्या अडचणी वाढतील, पण काही राशींसाठी ते विशेषतः फलदायी ठरेल. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
मेष
अस्त होताच शनि मेष राशीच्या लोकांवर कृपा वर्षाव करणार आहे. शनीचा अस्त तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल. या राशीचे जे लोक व्यवसाय करतात, त्यांना शनिदेव खूप फायदा करून देतील. नोकरीत तुमच्या कामावर तुमचा बॉस खूप खूश असेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
नोकरीत चांगली प्रगती होईल
शनीच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना नोकरीत चांगली प्रगती होईल. तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्हाला काम आणि व्यवसायाच्या संदर्भात अनेक प्रवास करावे लागतील, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त खूप शुभ राहील. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. जे आधीच विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होईल. विवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो.
चांगला नफा मिळेल
मिथुन राशीच्या लोकांचे काम खूप दिवसांपासून प्रलंबित होते ते लवकरच पूर्ण होऊ शकतात. सरकारी कामातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यावसायिकांना शनिदेव चांगला नफा मिळवून देतील. शनिदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देतील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त खूप खास असणार आहे. जे लोक दीर्घ काळापासून वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. तुमच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील.
नोकरीत बढती मिळेल
तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. जे लोक नोकरीत आहेत, त्यांना त्यांचे सहकारी, बॉस आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रोत्साहन आणि लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : शनीची साडेसाती खूप वेदनादायक; तुमच्याही पत्रिकेत असेल तर 'हे' सोपे उपाय तुम्हाला शनि प्रकोपापासून वाचवतील, जाणून घ्या