Shani Dev : नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांना शनी साडेसातीचा होईल त्रास, टाळण्यासाठी उपाय जाणून घ्या
Shani Dev : नवीन वर्षात काही राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रास होईल. जाणून घ्या सविस्तर
Shani Dev : कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. 2024 मध्ये शनी कुंभ राशीत प्रतिगामी होईल. पुढील वर्षी शनीची उलटी चाल काही राशींवर फार जड जाणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहे. 2024 मध्येही शनि या राशीत राहील.
'या' राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव दिसून येईल
पुढील वर्षी शनि राशी बदल करणार नाही, मात्र कुंभ राशीत असूनही शनीच्या चालीमध्ये बदल होईल. 2024 मध्ये शनी कुंभ राशीत प्रतिगामी होईल. नवीन वर्षात काही राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रास होईल. नवीन वर्षात शनिदेव कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना सोडणार नाहीत. या राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव दिसून येईल. नवीन वर्षात शनिदेव या राशीच्या लोकांना खूप त्रास देतील.
2024 मध्ये शनि जेव्हा वक्री होईल, तेव्हा...
कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनि जेव्हा वक्री होईल, तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांना शनिमुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक चढउतारांना सामोरे जावे लागेल. सन 2024 मध्ये मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. मकर राशीवर साडेसातीचा तिसरा टप्पा, कुंभ राशीवर दुसरा टप्पा आणि मीन राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा असेल.
'या' राशींना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते
मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना पुढील वर्षी कामात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नशीब तुमच्या बाजूने नसेल तर तुमचे कोणतेही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही. धनहानी देखील होऊ शकते. 2024 मध्ये या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार येऊ शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.
टाळण्यासाठी उपाय जाणून घ्या
सन 2024 मध्ये ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ढैय्या असेल, त्यांनी प्रत्येक शनिवारी उपवास करून शनि महाराजांची पूजा करावी. शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि ढैय्याचे दुष्परिणाम कमी होतील.
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 2024 मध्ये शनि-केतूमुळे बनणार षडाष्टक योग; 'या' 4 राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, मिळणार नोकरीच्या ऑफर्स