Shani Dev Dhaiyya : 2026 मध्ये 'या' 2 राशींवर घोंगावणार संकटांचं वादळ; शनिच्या ढैय्यामुळे एकामागोमाग येतील आव्हानं, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shani Dev Dhaiyya 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात सिंह आणि धनु राशींच्या लोकांना शनिच्या ढैय्याचा सामना करावा लागणार आहे.

Shani Dev Dhaiyya 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतीच 28 नोव्हेंबर रोजी शनिची मार्गी (Shani Margi) चाल केली आहे. त्यानुसार, आता नवीन वर्ष 2026 कर्मफळदाता शनि संक्रमण करणार नाही. या दरम्यान शनि (Shani Dev) पुन्हा एकदा जुलै महिन्यात मार्गीपासून वक्री चाल चालणार आहेत. त्यामुळे 2025 प्रमाणेच नवीन वर्षात देखील दोन राशींना (Zodiac Signs) शनिच्या ढैय्याचा सामना करावा लागणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात सिंह आणि धनु राशींच्या लोकांना शनिच्या ढैय्याचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अचानकपणे वाढ होईल. तुम्हाला मानसिक चिंता सतावेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
शनिच्या ढैय्याचा सामना सिंह राशीच्या लोकांना करावा लागणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अनावश्यक वाढ झालेली दिसेल. तसेच, या काळात कोणतीही महत्त्वाची कामे हातात घेऊ नका. पैशांची गुंतवणूक करण्याआधी घरातील सदस्यांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमचा बॅंक बॅलेन्स देखील अचानकपणे बिघडू शकतो.
तसेच, या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षातील काही महिने थोडे मानसिक तणावाचेच असतील. तुम्हाला दिर्घकालीन आजार देखील पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. या काळात शक्यतो लांबचा प्रवास करणं टाळा. या काळात कोणाविषयीही वाईट हेतू मनात ठेवू नका. तसेच, तुमची सेवाभावी वृत्ती दिसू द्या.
धनु रास (Saggitarius Horoscope)
नवीन वर्षात धनु राशीवर ढैय्याचा प्रभाव कायम असणार आहे. या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला हवा तसा नफा मिळणार नाही. संपत्तीच्या बाबतीत तुम्हाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुमच्या आर्थिक स्थितीबाबत जास्त गाजावाजा करु नका. संतुलित आहार घ्या. वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
शनिच्या ढैय्यामुळे तुमच्या नातेसंबंधांवर देखील परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. मात्र, हा प्रवास सावधानतेने करा. नवीन वर्षात कोणत्याही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु नका. तसेच, वाहन किंवा प्रॉपर्टी विकत न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीनेच पैसा कमवायचा आहे. शनिला कर्मफळदाता म्हणतात त्यामुळे तुमच्या प्रत्येक कृतीवर शनिदेवाचं लक्ष असेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















