Shani Dev: आज शनि होणार अस्त, या राशींचे भाग्य बदलू शकते, तर काहींच्या वाढणार समस्या
Shani Dev: शनी अस्त ही ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. यामुळे अनेक राशींच्या समस्या वाढतील, परंतु काही राशींना खूप फायदा होईल.
Shani Dev Ast Effect, Shani Asta 2023: पंचांगानुसार आज म्हणजेच 30 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत अस्त (Shani Ast) होणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनिला सर्व ग्रहांचे न्यायाधीश मानले गेले आहे. शनिदेवाला कर्माचा दाता म्हणूनही वर्णन केले आहे. असे नाही की, शनिदेव नेहमी अशुभ फळ देतात. तुमच्या कर्मानुसार शनिदेव देखील शुभ फळ देतात. असे मानले जाते की शनिदेव मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. म्हणूनच त्यांना कलियुगाचा दंडाधिकारी असेही म्हणतात.
ग्रह कसे अस्त होतात?
ज्योतिषशास्त्रात जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो अस्त होते असे मानले जातो. जेव्हा तो अस्त होतो, तेव्हा ग्रह दिसत नाहीत. अस्त अवस्थेत ग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि त्यांची फळे कमी होतात. 30 जानेवारी रोजी 12:02 वाजता, शनी कुंभ राशीत अस्त होईल आणि संपूर्ण 33 दिवस कमजोर स्थितीत राहील. अनेक राशींवर शनीची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करेल.
शनि कधी अस्त होणार?
पंचांगानुसार, आज 30 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. तो 6 मार्च 2023 च्या रात्रीपर्यंत कुंभ राशीत अस्त अवस्थेत राहील. त्यानंतर त्याचा उदय होईल. शनीची स्थिती सर्व 12 राशींवर परिणाम करते, परंतु सर्वात शुभ प्रभाव या राशींवर राहील.
शनि अस्ताचा शुभ प्रभाव
मिथुन राशीवर शनि ग्रहाचा शुभ प्रभाव
या राशीच्या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायावर शनीच्या अस्ताचा शुभ प्रभाव पडेल. यामध्ये त्यांना भरपूर यश मिळेल. करिअरमध्ये मेहनत करून यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कन्या राशीवर शनि अस्ताचा शुभ प्रभाव
शनीची अस्त झाल्यामुळे शनीचा वाईट प्रभाव कमी होईल. त्यामुळे या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात मोठ्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळेल.
मकर राशीवर शनि अस्ताचा शुभ प्रभाव
शनीच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अधिक फायदा होईल.
मीन राशीवर शनि अस्ताचा शुभ प्रभाव
तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. दीर्घकाळ अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील. धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
शनि अस्ता दरम्यान हे उपाय करा
प्रत्येक शनिवारी शनीच्या अस्ताच्या वेळी एका नारळात साखर आणि पीठ भरावे. यानंतर मुंग्यांच्या जागी ठेवा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या