Shani Dev 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर गुरुच्या राशीत होणार शनीचा उदय, 'या' 3 राशींचं झटक्यात पालटणार नशीब; नशिबाचे दार होतील खुले
Shani Dev 2025 : शनीच्या उदयाचा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी फार फलदायी असणार आहे. मिथुन राशीच्या कर्म भावात शनीचा उदय होणार आहे.

Shani Dev 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) ठराविक वेळानंतर उदय आणि अस्त होतो. याचा प्रभाव मानवासह संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो. आपल्याला माहीतच आहे की, शनीचा (Lord Shani) एप्रिलमध्ये उदय होणार आहे. त्यामुळे शनीच्या उदयाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. या काळात तीन राशींचं नशीब पलटू शकतं. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीच्या उदयाचा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी फार फलदायी असणार आहे. मिथुन राशीच्या कर्म भावात शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. तसेच, या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तसेच, आर्थिक बाबतीत तु्मच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या उदयाचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली तुम्हाला दिसेल. तसेच, तुम्ही जे नवीन प्रोजेक्ट हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश लाभेल. व्यवसायाशी संबंधित पैशांची समस्या तुमची लवकरच दूर होईल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय होणं फार अनुकूल ठरमार आहे. या राशीच्या चतुर्थ भावात शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-सुविधांत चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार चांगला आहे. तुम्हाला त्यातून चांगला लाभ मिळेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीचाही तुम्हाला लाभ घेता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















