Shani Asta 2024 : आज शनि अस्त होऊन 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक स्थिती होणार मजबूत, मिटणार सारे दु:ख
Shani Effect: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या हालचालीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर पडतो. 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:56 वाजता शनि मावळणार असून 18 मार्चपर्यंत तो त्याच स्थितीत राहील, या दरम्यान काही लोकांवर शनीची विशेष कृपा राहील.
![Shani Asta 2024 : आज शनि अस्त होऊन 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक स्थिती होणार मजबूत, मिटणार सारे दु:ख Shani Asta 2024 in kumbha these zodiac sign people will get lot of money strong financial condition and happiness Shani Asta 2024 : आज शनि अस्त होऊन 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक स्थिती होणार मजबूत, मिटणार सारे दु:ख](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/52b18bbcce3370f3b57ee626c7bcb767170719051460589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Asta 2024 : वैदिक ज्योतिषातही शनिदेवाला (Shani Dev) विशेष महत्त्व आहे. शनीच्या हालचालीतील थोडासा बदल देखील सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेत मार्गक्रमण करतो, विशिष्ट कालावधीत ग्रहांचा उदय होतो आणि अस्त होतो, याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येतो.
11 फेब्रुवारीला, म्हणजेच आज संध्याकाळी 6:56 वाजता शनि कुंभ राशीत अस्त होणार असून 18 मार्चपर्यंत तो या स्थितीत राहील. शनीचा अस्त होईल आणि तो सूर्याजवळ राहील आणि त्यामुळे त्याची शक्ती कमी होईल. अशा परिस्थितीत हा काळ काही राशींसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना यावेळी फायदा होईल? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजपासून, म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून शनि तुमच्या नवव्या भावात अस्त स्थितीत असेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल.
कर्क रास (Cancer)
शनि कर्क राशीच्या आठव्या भावात अस्त होत आहे, त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असू शकतो. ज्यांना नोकरीत अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी येणारा काळ चांगला असेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगल्या नफ्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
सिंह रास (Leo)
शनीच्या अस्ताचा तुमच्या सप्तम भावावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत या काळात तुम्हाला पावलोपावली यश मिळेल. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. कामाच्या बाबतीत तुम्हाला समाधान मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani : 'या' कामांमुळे शनि होतो प्रसन्न; दूर होतात सर्व समस्या, राहते सदैव कृपा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)