Shani Amavasya Upay 2024 : शनी अमावस्येला करा मिठाचे 'हे' जालीम उपाय; आर्थिक संकटांपासून होईल कायमची सुटका
Shani Amavasya Upay 2024 : शनिवारी येणारी अमावस्या ही शनिश्चरी अमावस्या म्हणनू ओळखली जाते. हिंदू धर्मात शनी अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी शनीची विधीपूर्वक पूजा केली जाते.
Shani Amavasya Upay 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला अमावस्या येते. त्यानुसार आज शनी अमावस्या (Shani Amavasya) आहे. आज वर्षाची शेवटची अमावस्या असल्याला या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शनिवारी येणारी अमावस्या ही शनिश्चरी अमावस्या म्हणनू ओळखली जाते. हिंदू धर्मात शनी (Shani Dev) अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी शनीची विधीपूर्वक पूजा केली जाते.
शनी अमावस्येच्या दिवशी जप, तप, पूजा करण्यासा विशेष महत्त्व असते. अशा वेळी तुम्ही मिठाचे काही खास उपाय करुन शनी अमावस्येपासून सुटका मिळवू शकतात. हे उपाय केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.
शनी अमावस्येला करा 'हे' उपाय
ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रात काही मिठाचे उपाय सांगितले जातात. त्यानुसार,
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा 'हा' उपाय
जर तुम्ही आर्थिक संकटांनी त्रस्त असाल तर तुम्ही आजच्या दिवशी पाण्यात थोडेसे मीठ घालून त्याने घर पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचबरोबर घरात लक्ष्मीचा वास राहतो. त्यामुळे हा उपाय तुम्ही करु शकता.
काचेच्या ग्लासात थोडं पाणी आणि मीठ मिसळा
- शनी अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासात थोडं पाणी घ्या आणि त्यात मीठ मिसळा. त्यानंतर हे मिश्रण घराच्या नैऋत्य (दक्षिण किंवा पश्चिम) दिशेला ठेवा. या मिश्रणाजवळ लाल रंगाचा बल्ब लावा. हे पाणी संपल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरा. हा उपाय केल्यास तुमच्या घरात पैशांची कमतरता भासणार नाही.
- शनिवारी मिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घाला. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो.
- शनी अमावस्येला पितरांना जल अर्पण केल्यानंतर दान करा.
- तसेच, आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळाला जल अर्पण केल्यानंतर, 'ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: