Shani Nakshatra Gochar 2024 : शनी करतोय गुरु नक्षत्रात प्रवेश, 2025 पासून 'या' राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन'; धन-संपत्तीत मिळणार लाभच लाभ
Shani Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात 27 डिसेंबर रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करणार आहे.
Shani Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीला (Shani Dev) सर्व नवग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि बलवान असा ग्रह मानला जातो. शनीच्या (Lord Shani) स्थितीत जरा देखील बदल आल्यास त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) होतो. तसेच, शनी सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह असल्याने त्याचा परिणाम देखील दिर्घकाळ टिकणारा असतो.
सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत विराजमान आहे. एका ठराविक कालावधीनंतर शनी राशी परिवर्तन करणार आहे. या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात 27 डिसेंबर रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. तर, 28 एप्रिल 2025 पर्यंत याच नक्षत्रात असणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन याच राशीच्या अकराव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील या काळात पूर्ण होऊ शकते. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कार, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या सहाव्या चरणात शनी स्थित असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, नोकरीचे चांगले पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती मिळेल. तुम्ही जोमाने काम सुरु कराल. तसेच, बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या चौथ्या चरणात शनी स्थित असणार आहे. या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी नोकरीचे अनेक प्रस्ताव येत राहतील. तुमच्या व्यवसायात चांगली वृद्धी होईल. तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. फक्त या कालावधीत तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: