Shani Amavasya 2024: आज शनि अमावस्येला धन-समृद्धी तुमच्याकडे येईल चालून! 'असे' उपाय जे अनेकांना माहित नाहीत, फरक जाणवेल काही दिवसात
Shani Amavasya 2024: आज शनि अमावस्यानिमित्त असे उपाय जाणून घ्या, जे फार कमी लोकांना माहित आहेत. जे आज केल्याने काही दिवसातच फरक जाणवेल.
Shani Amavasya 2024: हिंदू धर्मात भगवान शनिदेवाला (Shani Dev) कर्माचा दाता म्हटले जाते, तर त्यांना न्यायाची देवताही म्हणतात. व्यक्तीच्या प्रत्येक वाईट-चांगल्या कर्माचे फळ ते देतात. अशात शनिदेवाची दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर पडली, तर ती व्यक्ती राजापासून रंक बनायला वेळ लागणार नाही, म्हणूनच शनिच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी. यामुळे शनिदेवाची कृपा सदैव आपल्यावर राहते. आज शनि अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. या अमावस्येला शनिदेवाचे उपाय केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज शनि अमावस्येला तुम्ही काही उपाय देखील करू शकता. जे फार लोकांना माहित नाही, जाणून घेऊ शनी अमावस्येचे उपाय.
शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मिळेल आराम!
हिंदू धर्मात शनि अमावस्या विशेष मानली जाते. ही अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिवसभर असेल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यास दुप्पट फळ मिळेल. शनिवारी अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून आराम मिळतो. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे. यामुळेच जीवनात संघर्षाचे दिवस येतात, कारण पृथ्वीवर कुठेतरी आपण आपल्या मागच्या जन्माच्या कर्माची फळे घेत असतो. जाणून घेऊ शनी अमावस्येचे काही खास उपाय.
पंचांगानुसार शनि अमावस्येची तिथी जाणून घ्या
पंचांगानुसार, शनी अमावस्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:29 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:50 वाजता समाप्त होईल. मार्गशीर्ष अमावस्या शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिवसभर राहील. अशा स्थितीत शनिदेवाची पूजा केल्यास दुप्पट फळ मिळेल. मात्र, अमावस्येच्या स्नानाचे दान 1 डिसेंबर रोजी उदयतिथीला वैध असेल.
शनि अमावस्येचे महत्त्व काय?
शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी शनि अमावस्या हा शुभ दिवस मानला जातो. शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ असते. ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनीचा अशुभ प्रभाव आहे त्यांनीही शनि दर्शन टाळावे. शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय प्रभावी मानले जातात. शनि अमावस्येला मोहरीच्या तेलात तीळ मिसळून शनिदेवाला अर्पण करावे.
शनि अमावस्येला शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करा
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून सूर्यास्तानंतर त्याचा अभिषेक करावा.
- तसेच काळे-निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करा. तसेच 'ओम शम शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा.
- शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो.
- अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण विशेष फायदेशीर मानले जाते.
- त्याच्या प्रभावामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि बजरंगबलीच्या भक्तांना त्रास होत नाही.
- यामुळे जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. हनुमानजींच्या कृपेने माणसाला अडचणींचा सामना करावा लागत नाही.
- अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या आणि नोकरीच्या समस्या दूर होतात.
- या दिवशी सकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे.
- नंतर पिंपळाच्या पाच पानांवर पाच मिठाई ठेवा. यानंतर तुपाचा दिवा लावून सात परिक्रमा करावी.
- केवळ शनी अमावस्येलाच नाही तर शनिवारी आणि प्रत्येक अमावस्येला गरजू लोकांना मोहरीचे तेल,
- काळे तीळ, कपडे, ब्लँकेट, शूज आणि चप्पल दान करा.
- या उपायाने शनीच्या प्रकोपापासूनही आराम मिळतो.
हेही वाचा:
Amavasya 2025: 2025 मधील 'या' अमावस्या विशेष! कधी आणि कोणत्या तारखेला आहे? सर्व तारखा जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)