September 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा महिना चांगला की वाईट? कसा जाणार महिना? मासिक राशीभविष्य वाचा
September 2025 Monthly Horoscope: सप्टेंबरचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

September 2025 Monthly Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना (August) लवकरच सुरु होत आहे. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती तशी शुभ मानली जातेय. या महिन्यात तब्बल 2 ग्रहणं होतील. एक चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण.. तसेच या महिन्यात मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries August 2025 Monthly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना उत्तम असेल. या काळात तुम्हाला वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु बुद्धिमत्ता, विवेक आणि शुभचिंतकांच्या मदतीने मोठ्या समस्या सोडवणे शक्य होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचा वेळ आणि उर्जेचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. व्यावसायिकांना अधिक मेहनत करावी लागेल. महिन्याच्या मध्यात कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा.
वृषभ रास (Taurus August 2025 Monthly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरच्या महिन्यात विविध क्षेत्रात आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. लोकांना भेटणे आणि लवचिक वृत्ती स्वीकारणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बॉस आणि सहकाऱ्यांशी सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान शिकणे फायदेशीर ठरेल. मुले आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.
मिथुन रास (Gemini August 2025 Monthly Horoscope)
मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना व्यस्त आणि आव्हानात्मक असेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील, परंतु जबाबदाऱ्यांचा भार देखील वाढू शकतो. या काळात मित्र आणि हितचिंतक तुम्हाला साथ देतील. महिन्याच्या उत्तरार्धात नफ्याचे आणि अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क रास (Cancer August 2025 Monthly Horoscope)
कर्क राशीसाठी सप्टेंबर महिना मिश्रित राहील. करिअर आणि व्यवसायात संधी मिळतील, परंतु नातेसंबंध आणि आरोग्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सुधारणा होईल.
सिंह रास (Leo August 2025 Monthly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ राहील. दीर्घकाळापासून अपेक्षित यश किंवा चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन उंची गाठता येईल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या रास (Virgo August 2025 Monthly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना सुरुवातीला धावपळीने भरलेला असेल. अतिरिक्त जबाबदाऱ्या असूनही, महिन्याच्या मध्य आणि उत्तरार्धात तुम्हाला नफा आणि यश मिळू शकते. व्यवसायात बदल आणि नफा दिसून येईल. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि प्रेम जीवनात सुधारणा होईल.
हेही वाचा :
Monthly Lucky Zodiac: सप्टेंबर महिना 'या' 5 राशींचे भाग्य पालटणारा! शक्तिशाली भद्रा राजयोग बनतोय, लखपती निश्चित होण्याचे संकेत...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















