(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Scorpio Horoscope Today 1 November 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराचा पाठिंबा, आरोग्याची काळजी घ्या; आजचं राशीभविष्य
Scorpio Horoscope Today 1 November 2023 : जर तुमचे पैसे नोकरीत अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील.
Scorpio Horoscope Today 1 November 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, जर तुम्हाला तुमचा बंद झालेला व्यवसाय पुन्हा सुरू करायचा असेल तर त्यासाठी दिवस खूप शुभ राहील. तुमचे काम खूप चांगले होईल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे शेअर्स खूप जास्त किमतीत विकले जातील. आज वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. अपघाताला सामोरे जावे लागू शकते आणि शारीरिक इजाही होऊ शकते. बदलत्या वातावरणात आरोग्याचीही काळजी घ्या.
नोकरीत बढतीची संधी
आज वृश्चिक राशीच्या लोकांना तुम्हाला तुमचा बालपणीचा मित्र भेटण्याची शक्यता आहे. ज्याला पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. तसेच, अनेक जुन्या आठवणींना उजाळाही द्याल. आज कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्लॅन पुढे ढकला. हा प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. घराबाहेर कुठेही जाऊ नका. नोकरी करणार्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला तुमच्या नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. पण, तुम्हाला तुमचे वर्तन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. तुमचे विरोधकही तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि ते तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांतता असेल, पण आत्मविश्वास कमी होईल.
वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
आज वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद जाणवेल. आज तुम्हाला सामाजिक कार्यातही वेळ मिळेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, त्यांच्याबरोबर बालपणीच्या आठवणी ताज्या होतील.
आज वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य
आरोग्याची काळजी घेताना बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. आज काही लोक गुडघेदुखीची त्रासाने त्रस्त असतील.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :