Sarva Pitri Amavasya 2025 : सर्वपितृ अमावास्येचा करा 'हा' खास उपाय; पितृदोषाचा प्रभाव होईल कमी, पदरात पडेल फक्त पुण्य
Sarva Pitri Amavasya 2025 : धार्मिक मान्यता आहे की सर्वपितृ अमावस्याला केलेले श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती आणि शांती मिळते.

Sarva Pitri Amavasya 2025 : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पितृपक्ष (Pitru Paksha 2025) पंधरवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. यालाच आपण सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitri Amavasya) असं म्हणतो. हा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. तर काही राशींनी या दिवशी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी काही खास माहिती दिली आहे. ते सविस्तर जाणून घेऊयात.
सर्वपितृ अमावास्येचा खास उपाय
- तुळशीला बांधा 108 गाठीचा धागा.
- पितर प्रसन्न होतील, लक्ष्मी कृपा वाढेल.
- आर्थिक चणचण दूर होईल, घरात समृद्धी नांदेल.
धार्मिक मान्यता आहे की सर्वपितृ अमावस्याला केलेले श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती आणि शांती मिळते. हा कर्मकांड थेट पितृलोकापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पितर प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना दीर्घायुष्य, धन-धान्य आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात.
मान्यता अशी आहे की, या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केले तर पितृदोषाचा प्रभाव कमी होतो आणि घर-परिवारात सुख-समृद्धी येते.
पिवळा धागा किंवा कलावा बांधण्याचा उपाय अतिशय अचूक असा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा किंवा लाल कलावा घेऊन त्यात 108 गाठी मारा आणि तो तुळशीच्या कुंडीत बांधा.
असे केल्याने घर-परिवारावर सुख-समृद्धी राहते.
देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
हळूहळू आर्थिक संकटे दूर होतात.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















