एक्स्प्लोर
Parinay Fuke on Bachchu Kadu : 'बच्चू कडूंची स्टंटबाजी, जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmers' Loan Waiver) मुद्द्यावरून नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आणि आमदार परिणय फुके (Parinam Fuke) यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावर टीका केली आहे. 'नेहमी अशी स्टंटबाजी करणं योग्य नाही,' असे परिणय फुके यांनी म्हटले आहे. फुके यांनी स्पष्ट केले की, सरकारला एक वर्षही पूर्ण झालेले नाही आणि जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी शंभर टक्के होणार, पण राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दुसरीकडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलावल्याची माहिती दिली आहे, तर बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबर रोजी नागपुरात मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















