एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस! जाणून घ्या पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस. हिंदूधर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी येते.त्यानुसार, अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज आहे. ही संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) लाडक्या गणरायाला समर्पित आहे.कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

शुक्ल पक्षातील तिथी ही विनायकी चतुर्थी असते तर कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी चतुर्थी तिथीचं व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सुख-सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यानुसार, आजच्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता, पूजेची पद्धत कशी असणार? या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. 

आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2024)

हिंदू पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील तिथी ही गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने भक्तांना पुण्य फळ मिळतं. त्यानुसार आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 रोजी संकष्ट चतुर्थी तिथी आहे. संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त सकाळी 06 वाजून 46 मिनिटांनी सुरु झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 04 वाजून 16 मिनिटांनी हे व्रत संपेल.या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 07 वाजून 54 मिनिटांनी असणार आहे. 

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. तसेच मनोभावे श्रवण करावे.
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 20 October 2024 : आज संकष्ट चतुर्थी! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion : पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget