Sankashti Chaturthi 2024: उद्या संकष्टी; मिठाची चतुर्थी व्रत कसे करावे? 21 चतुर्थीचे व्रत करेल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण
Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी गणपतीचे व्रत केले जाते. या व्यतिरिक्त तुम्ही मिठाची चतुर्थी हे व्रत देखील ऐकले असेल. नेमके व्रत काय आहे?
Sankashti Chaturthi 2024: हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) मनोभावे पुजा केल्या श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवार 28 मार्च रोजी आहे. रात्री 9.04 वाजता चंद्रोदय होईल. चतुर्थीला चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी गणपतीचे व्रत केले जाते. या व्यतिरिक्त तुम्ही मिठाची चतुर्थी हे व्रत देखील ऐकले असेल. नेमके व्रत काय आहे?
मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो. तसेच इच्छित फळ देतो. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून करता येते. अगदी तुम्ही उद्याच्या चतुर्थीपासून देखील हे व्रत करु शकता. अंगारकी चतुर्थीपासून देखील हे व्रत सुरू करता येते. 21 चतुर्थी हे व्रत केले जाते. हे व्रत अगदी सोपे असून कोणीलाही करता येईल. हे व्रत सुरू करताना संकल्प करणे आवश्यक आहे. पहिल्या चतुर्थीला हा संकल्प करायचा आहे.
मिठाची चतुर्थीला पुजा कशी करावी?
- चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान केल्यानंतर एका ताम्हाणात गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. गणेश स्तोत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे.
- देव्हाऱ्यात जिथे गणपती जिथे ठेवणार तिथे अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर जास्वंदीचे लाल फुल किंवा 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी. त्यानंतर देवासमोर साखर ठेवावी.
उपवास कसा करावा?
- चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा. या उपवसाला शाबुदाणा खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.
- ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मीठाचे सेवन करायचे नाही.दिवसभर तुम्ही चहा, दुध,फळे खाऊ शकतो. फक्त या दिवशी फक्त मीठाचे सेवन करायचे नाही.
- हे व्रत चंद्रोदयाला सोडायचे आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये.
- नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची आरती करून चंद्राला नैवेद्य दाखवावा.
- मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदत बनवणे आवश्यक आहे. उकडीचे, तळणीचे कोणत्या पद्धतीने 21 मोदक बनवावे.
- 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालावे. मात्र एक मोदक असा बनवावा ज्यामध्ये तुम्ही मीठ घालायचे आहे.
- उकड घेतल्यानंतर 20 नारळाचे आणि मीठाचा एक असे 21 मोदक एकत्र करून घ्यावे. कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही.
- चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा करुन या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
- गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना जमीनीवर बसून एक आसन घ्यावे. त्या आसनावर बसावे.
- उपवास सोडताना कधीही जमीनीवर बसू नये.
- उपवास सोडताना 21 मोदक घ्यावे आणि एक एक मोदक खााण्यास सुरुवात करावी.
- मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मीठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर जेवण करु नये.
- उपवास सोडताना कोणाशी बोलू नये.
- शिल्लक राहिलेले मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यावे. बाहेरच्या कोणलाही हे मोदक देऊ नये.
असे 21 चतुर्थी हे व्रत करायचे आहे. हे व्रत केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :