(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sagittarius Horoscope Today 11 November 2023 : धनु राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता, फक्त 'ही' गोष्ट टाळा; आजचं राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 11 November 2023 : तुम्ही तुमच्या पालकांचा पूर्ण आदर कराल आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल.
Sagittarius Horoscope Today 11 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा आव्हानात्मक असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. परंतु संध्याकाळी तुमचे काही नुकसान होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरवर जास्त विश्वास ठेवू नका, तो तुमचा विश्वासघात करू शकतो. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर आज त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मुलांचे मन अभ्यास आणि सर्जनशीलतेमध्ये चांगले गुंतलेले राहील. तुम्ही तुमच्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्याल. कोर्टाशी संबंधित तुमचे जे काही तणाव असतील ते आज दूर होऊ शकतील.
तुम्ही तुमच्या पालकांचा पूर्ण आदर कराल आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही त्यांची आणि तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. गॅसशी संबंधित समस्याही तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरी करणार्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि ते तुमच्यावर खूश असतील. तुम्ही तुमचा आनंद तुमच्या कुटुंबीयांबरोबर शेअर कराल, तुमच्या प्रगतीमुळे तुमचे पालक खूप आनंदी होतील.
उच्च शिक्षणासाठी काळ चांगला
आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु, पैशांच्या बाबतीत, तुम्ही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
आजचे धनु राशीचे आरोग्य
आज तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, दातदुखी इ. उपचारास उशीर करू नका. याशिवाय आज खाण्यापिण्याची काळजी घ्या.
धनु राशीसाठी आजचे उपाय
उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :