Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shani Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिची ही वक्री चाल काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Shani Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनि देव (Shani Dev) 27 जुलै 2026 रोजी मीन राशीत वक्री झाला आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 2026 रोजी याच राशीत तो मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिची ही वक्री चाल काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात कोणकोणत्या राशींनी (Zodiac Signs) सावधानता बाळगण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनिची वक्री चाल कन्या राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्ही केलेली मेहनत वाया जाईल. तुमच्या कामाचं कौतुक होणार नाही. त्यामुळे तुम्हाला सतत मानसिक ताण जाणवू शकतो. नवीन संपर्क वाढल्याने तुमच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करु नका. यामुळे तुमचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी देखील हा काळ फार कठीण काळ असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सतत गोंधळात असाल. नवीन लोकांशी संपर्क साधताना लगेच विश्वास ठेवू नका. तसेच, जास्त भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला धैर्याने काम करणं गरजेचं आहे. या काळात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कुटुंबात तणावाचं वातावरण जाणवू शकतं.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीमध्येच शनिची वक्री आणि मार्गी चाल होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तुमची छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. यामुळे तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. करिअरच्या बाबतीत अनेक चढ-उतार येऊ शकतात. व्यवसायातही कोणती मोठी रिस्क घेऊ नका. मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या महत्त्वाच्या कामांना आदी प्रोत्साहन द्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात या कालावधीत न केलेलीच बरी आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ या कालावधीत असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Vastu Tips : घराच्या देव्हाऱ्यात 'या' 4 वस्तू ठेवाच, नकारात्मकता असो वा आर्थिक तंगी सर्व समस्या झटक्यात होतील दूर



















