Hindu Rituals : हिंदू धर्मात महिला पूजेचा नारळ का फोडत नाहीत? 'ही' आहेत कारणे
Hindu Rituals : ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात, तेव्हा त्या तो का फोडू शकत नाहीत?
Hindu Rituals : विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडू शकत नाहीत. ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात, तेव्हा त्या तो का फोडू शकत नाहीत? शेवटी महिलांना नारळ फोडता येत नाही असे काय आहे? याचे कारण जाणून घेऊया.
'या' कारणांमुळे महिला नारळ फोडत नाहीत
-पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
-नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो.
-नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.
-नारळ हे बीजस्वरूप मानले जाते आणि स्त्री बीजस्वरूपात अर्भकाला जन्म देते, म्हणून महिलांनी नारळ फोडू नये असे मानले जाते.
महिलांना गर्भधारणेत समस्या येतात
असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला, अशी धार्मिक धारणा आहे. ज्या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात तीन डोळे बनतात, या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Chanakya Niti : शत्रूचा पराभव करायचा असेल तर जाणून घ्या चाणक्याच्या 'या' गोष्टी
- Chanakya Niti : 'या' लोकांजवळ पैसा थांबत नाही, कर्ज आणि पैशाच्या कमतरतेमुळे असतात त्रस्त
- Chanakya Niti : चाणक्यंच्या ‘या’ 5 गोष्टी आचरणात आणा आणि कोणतंही ध्येय सहज साध्य करा!