Ramayana: रामायण काळातील 'या' 5 गोष्टीं आजही अस्तित्वात? प्रभु श्रीरामांनी स्वत: केल्या निर्माण, कलियुगही साक्षीदार! जाणून घ्या..
Ramayana: त्रेतायुगातील 'या' वस्तू आज कलियुगातही प्रसिद्ध आहेत. प्रभू श्री रामाने बनवलेल्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? जाणून घेऊया
Ramayana: मंगल भवन अमंगल हारी.. द्रबहु सुदसरथ अचर बिहारी.. राम सिया राम.. हिंदू धर्मात रामायण एक पवित्र ग्रंथ मानला जाते. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणातील कथेनुसार, भगवान राम 14 वर्षे वनवासात गेले होते. त्या काळात प्रभू रामांनी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अनेक ठिकाणी समाज कल्याणाची अनेक कामे केली. त्रेतायुगात बनवलेल्या या वस्तू आज कलियुगातही प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया प्रभू श्री रामाने बनवलेल्या 5 गोष्टी कोणत्या आहेत?
प्रभू रामांकडून रामेश्वरम शिवलिंग निर्माण
रामायणातील कथेनुसार, वनवास काळात प्रभू रामांनी समाज कल्याणाची अनेक कामे केली. विशेषत: जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते, तेव्हा श्रीराम माता सीतेच्या शोधात आणि तिला परत आणण्यासाठी अनेक ठिकाणी गेले, तेथे त्यांनी राहून अनेक वस्तू बांधल्या. श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी निघाले होते, त्यापूर्वी श्रीरामांनी रामेश्वरममध्ये शिवलिंगाची स्थापना करून भगवान शंकराची पूजा केली होती. याचा अर्थ असा की रामेश्वरममध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणारे भगवान श्रीराम हे पहिले होते. आजही रामेश्वरम हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
श्रीरामांनी बांधलेले देवी सीता आणि लक्ष्मण कुंड
वनवासाच्या काळात जंगलातील पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी श्रीरामांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनेक तलाव बांधले होते. आजही भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या तलावांना सीता कुंड आणि लक्ष्मण कुंड या नावानेही ओळखले जाते.
श्रीरामांनी चित्रकूट आणि नाशिक येथे गुहा बांधल्या
रामायणातील कथेनुसार, अयोध्या सोडल्यानंतर श्रीरामांनी चित्रकूट आणि नाशिक येथेही वास्तव्य केले. याच काळात पावसापासून बचाव करण्यासाठी श्रीरामांनी नाशिक आणि चित्रकूटमध्ये अनेक गुहा बांधल्या होत्या. आजही चित्रकूट आणि नाशिक येथील अनेक प्राचीन लेणी त्रेतायुगाच्या साक्षीदार आहेत.
समुद्रावरचा पूल श्रीरामांनी बांधला होता
श्री रामाने नला आणि नील यांच्या मदतीने समुद्रावरील जगातील पहिला पूल बांधला होता. सध्या अशा अनेक आधुनिक वास्तू समुद्रावर पाहायला मिळतात. प्रभू रामांनी समुद्रावर बांधलेल्या पहिल्या पुलाचे नाव नल सेतू होते. पण बदलत्या काळानुसार लोक नल सेतूला राम सेतू म्हणू लागले.
श्री रामाने बांधलेली पर्णकुटी
वनवासातील प्रवासादरम्यान श्रीराम चित्रकूटला पोहोचले तेव्हा महर्षी भारद्वाजांनी गंगा-यमुना संगमाच्या टेकडीवर पर्णकुटी बांधण्याचा सल्ला दिला. रामजींनी पर्णकुटी बांधली. पुढे जाऊन रामजींनी इतर साथीदारांना नदीच्या काठावर थांबून विश्रांती घेण्यासाठी पर्णकुटी बनवायला शिकवले. कलियुगात किंवा आधुनिक युगातही नाशिक, श्रीलंका इत्यादी ठिकाणी पर्णकुटी दिसून येते, ज्याची निर्मिती सर्वप्रथम श्री रामाने केली होती. पानांपासून बनवलेल्या झोपडीला पर्णकुटी म्हणतात.
हेही वाचा>>>
Shaniwar Special: फक्त हनुमानजींनाच भूत-पिशाच्च का घाबरतात? नकारात्मक शक्ती का पळून जाते? आश्चर्यचकित व्हाल, जेव्हा कारण जाणून घ्याल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )