Raksha Bandhan 2024 : शुभवार्ता! यंदा रक्षाबंधनाला नसणार भद्राचं सावट; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांच्या रक्षणाच्या वचनासोबत काही खास भेटवस्तू देतात.
![Raksha Bandhan 2024 : शुभवार्ता! यंदा रक्षाबंधनाला नसणार भद्राचं सावट; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त Raksha Bandhan 2024 date bhadra kaal in patal lok never effect people on raksha bandhan shubh muhurta marathi news Raksha Bandhan 2024 : शुभवार्ता! यंदा रक्षाबंधनाला नसणार भद्राचं सावट; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/17f852fcfc9a7c37ec99b1f1e6c753841723952737983358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण बघता बघता उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा पवित्र पर्व श्रावण (Shravan) शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांच्या रक्षणाच्या वचनासोबत काही खास भेटवस्तू देतात.
राखीच्या धाग्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं. राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रोपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली, असं सांगण्यात येतं.
भद्राकाळात भावाला राखी कधी बांधावी?
यंदाच्या रक्षाबंधनाला भद्रा काळ असल्या कारणाने अनेक लोक चिंतेत आहेत. त्यामुळे भद्राकाळात भावाला राखी कधी आणि केव्हा बांधावी हा बहिणींना प्रश्न पडला आहे. यासाठीच, ज्योतिष शास्त्रानुसार, असं सांगण्यात आलं आहे की यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे पण त्याचा पृथ्वीवर कोणताच परिणाम होणार नाही.
'हा' आहे शुभ मुहूर्त
ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधन श्रावण शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. यंदा पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी रात्री 11.55 मिनिटांपर्यंत असणार आहे. 19 ऑगस्ट रोजी भद्राकाळ दुपारी 01.33 पर्यंत असणार आहे. पण, चंद्राचं स्थान मकर राशीत असल्या कारणाने भद्राकाळ पाताळमध्ये असणार आहे. त्यामुळे धरतीवर कोणत्याच प्रकारे भद्राकाळचा प्रभाव नसणार आहे. त्यामुळे बहिणी अगदी कोणताही मनात संकोच न ठेवता भावाला राखी बांधू शकतात. फक्त राहुकाळात राखी बांधू नये.
रक्षाबंधनाला केव्हा असणार राहुकाळ
रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळसुद्धा लागणार आहे. या दिवशी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहु काळ असणार आहे. त्यामुळे काळात चुकूनही राखी बांधू नये.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 01.46 पासून ते संध्याकाळी 04.19 पर्यंत असणार आहे. याचाच अर्थ राखी बांधण्यासाठी 2 तास 33 मिनिटांचा काळ असणार आहे. याशिवाय, तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळातसुद्धा भावाला राखी बांधू शकता.या दविशी संध्याकाळी 06.56 ते रात्री 09.07 वाजेपर्यंत प्रदोष काळ असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)