Rahu Shukra Yuti 2026 : तब्बल 18 वर्षांनंतर राहू-शुक्राची युती; 'या' 3 राशींचं भाग्य उजळलंच समजा, उत्पन्नाचे स्त्रोत होतील खुले
Rahu Shukra Yuti 2026 : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुक्र ग्रह शनिदेवाच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. या राशीत राहू ग्रहसुद्धा संक्रमण करणार आहे.

Rahu Shukra Yuti 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. ग्रहांच्या संक्रमणाच्या (Grah Gochar) दृष्टीने नवीन वर्ष फारच खास असणार आहे. त्यानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुक्र ग्रह शनिदेवाच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. या राशीत राहू (Rahu Gochar) ग्रहसुद्धा संक्रमण करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात कुंभ राशीत राहू-शुक्र ग्रह युती बनवणार आहेत.राहू-शुक्राचा संयोग ज्योतिष शास्त्राच्या तुलनेने फार प्रभावशाली मानला जातो.
राहू आणि शुक्र ग्रहाचा संबंध भौतिक सुख, आकर्षण, नाव प्रतिष्ठेषी संबंधित आहे. तर, राहू ग्रह वेग, महत्त्वाकांक्षा आणि असाधारण गोष्टीसाठी ओळखला जातो. शुक्र ग्रह आनंद, संबंध, कला, सौंदर्य, प्रेम आणि धनसंपत्तीचा कारक ग्रह मानतात. त्यानुसार 2026 च्या सुरुवातीला दोन ग्रहांच्या युतीने कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळेल ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राहू-शुक्राची युती वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच, करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राहू-शुक्र ग्रहाची युती मिथुन राशीसाठी लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ झालेली दिसेल. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. हातात घेतलेले कार्य वेळीच पार पडेल. प्रवासाचे योग जुळून येतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
राहू-शुक्र ग्रहाची युती धनु राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. नवीन ओळखी निर्माण होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















