Rahu Shukra Yuti 2025 : तब्बल 18 वर्षांनंतर होणार राहु-शुक्राची युती; 28 जानेवारीपासून 3 राशींचा 'गोल्डन टाईम' सुरु
Rahu Shukra Yuti 2025 : राहू ग्रह दर आठ महिन्यांनी नक्षत्र परिवर्तन करतात. एकूण 27 नक्षत्रांचं चक्र पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्या नक्षत्रात येण्यासाठी राहूला तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागतो.
Rahu Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहु (Rahu) ग्रहाला देखील विशेष स्थान आहे. राहू ग्रहाला सर्वात क्रूर ग्रह मानतात. राहू ग्रह दर आठ महिन्यांनी नक्षत्र परिवर्तन करतात. एकूण 27 नक्षत्रांचं चक्र पूर्ण केल्यानंतर पुन्हा त्या नक्षत्रात येण्यासाठी राहूला तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागतो. राहूच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) वेगवेगळ्या प्रकारे होतो.
शुक्रासह राहूची युती
सध्या राहू ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. या ठिकाणी शुक्रसुद्धा 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी याच नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याआधी 28 जानेवारी रोजी मीन राशीत राहूची शुक्र ग्रहाबरोबर युती झाली आहे. या दोन दुर्लभ संयोगामुळे काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशीचं आर्थिक स्तर देखील उंचावेल. या 3 भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्राच्या उत्तरा बाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताच मेष राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. राहु ग्रहाबरोबर युती झाल्याने या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तर, तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या आयुष्यात आनंद टिकून राहील. तसेच, धार्मिक यात्रेत तुमचं चांगलं मन रमेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना राहू-शुक्रच्या युतीचा चांगला लाभ मिळणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात ही युती जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात एकता दिसून येईल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांवर राहूची कृपा दृष्टी होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना खास असणार आहे. या काळात मित्रांबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमचे वाद संपुष्यात येतील. तर, बिझनेसमध्ये दुप्पट लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :