(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahu Ketu : 2023 पर्यंत 'या' दोन राशींना काळजी घ्यावी लागेल, राहु केतू ग्रहांची पडणार दृष्टी, जाणून घ्या उपाय
Astrology: राहू केतूची स्थिती कधीही हलक्यात घेऊ नये. हे असे दोन ग्रह आहेत जे क्षणात राजाला रंक आणि रंकला राजा बनवतात.
Rahu Ketu: राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रात विशेष ग्रह मानले जातात. हे ग्रह खूप शक्तिशाली मानले जातात. सर्वात मोठे ज्योतिषी देखील या ग्रहांबद्दल पूर्णपणे समजू शकले नाहीत. यामुळेच राहू केतूला मायावी ग्रह असेही म्हणतात. हे ग्रह शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देतात. सध्या हे ग्रह दोन राशींवर विशेष लक्ष ठेवून आहेत.
राहू केतू कथा
राहू केतू कोण आहे? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. एका पौराणिक कथेनुसार राहु केतू हे एकाच राक्षसाचे दोन भाग आहेत. स्वरभानू नावाचा एक राक्षस होता, जो समुद्रमंथनाच्या वेळी कपटाने अमृताचे काही थेंब पिण्यात यशस्वी ठरला होता, परंतु शेवटच्या क्षणी चंद्र आणि सूर्याने भगवान विष्णूंना याची माहिती दिली, त्यानंतर लगेचच विष्णूजींनी सुदर्शन चक्राने त्याची मान धडापासून वेगळी केली. पण तोपर्यंत अमृताचे काही थेंब त्यांच्या शरीरात गेले, त्यामुळे मृत्यू होऊनही तो जिवंत राहिला.याच कारणामुळे डोक्याच्या भागाला राहू आणि उर्वरित शरीराच्या धडाच्या भागाला केतू म्हणतात.
राहू केतू स्वभाव
ज्योतिष शास्त्रामध्ये राहु केतूला जीवनातील भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचे कारण मानले जाते. कुंडलीतील त्यांच्या शुभ आणि अशुभ स्थितीनुसार ते परिणाम देतात. हे ग्रह अशुभ ग्रह मानले जातात. हे कलियुगातील अतिशय प्रभावी ग्रह आहेत. सध्या या दोन राशींचे संक्रमण होत आहे.
मेष राशीतील राहू संक्रमण
ज्योतिष शास्त्रानुसार 12 एप्रिल 2022 पासून राहू मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीतील राहूचे संक्रमण 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहील. या काळात मेष राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल.
तूळ राशीतील केतू संक्रमण
केतू तूळ राशीमध्ये आहे. केतू देखील 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत या राशीत राहील. केतू हा मोक्ष आणि संशोधनाचा कारक देखील मानला जातो. तूळ राशीच्या लोकांना या काळात कर्ज टाळावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चुकीची संगत सोडावी लागेल.
उपाय
राहू केतूला शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. भगवान शिव आणि गणेशाची पूजा केल्याने हे ग्रह शांत राहतात. राहूला शांत ठेवण्यासाठी शिवाची पूजा करणे चांगले मानले जाते. दुसरीकडे बुधवारी गणेशाची पूजा केल्याने केतू शांत राहतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :