Hans-Malavya Rajyog 2026 : नवीन वर्षात 'हंस-मालव्य राजयोग' करणार कमाल; तब्बल 50 वर्षांनंतर 'या' राशी होतील मालामाल, श्रीमंतीचे योग
Hans-Malavya Rajyog 2026 : पंचांगानुसार, देवगुरु ग्रह बृहस्पती 2026 मध्ये आपल्या राशीत बसून हंस राजयोग निर्माण करणार आहे. शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करुन मालव्य राजयोग निर्माण होणार आहे.

Hans-Malavya Rajyog 2026 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाबरोबर अनेक राजयोग तसेच शुभ संयोग जुळून येणार आहेत. यामुळे मालव्य आणि हंस राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे. पंचांगानुसार, देवगुरु ग्रह बृहस्पती 2026 मध्ये आपल्या राशीत बसून हंस राजयोग निर्माण करणार आहे. शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करुन मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 मध्ये हे राजयोग जुळून आल्याने अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
नवीन वर्ष 2026 मध्ये हंस आणि मालव्य राजयोग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरु होणार आहे. हा राजयोग मेष राशीच्या चतुर्थ स्थातीन असणार आहे. त्यामुळे या काळात प्रॉपर्टी खरेदीचा शुभ काळ सुरु होणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, व्यवसायात प्रगतीचे अनेक संकेत मिळतील. सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन वर्षात जुळून येणारा हंस आणि मालव्य राजयोग लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुम्हाला व्यवसायात चांगली डील मिळू शकते. उत्पन्नात दुपटीने वाढ झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाची स्तुती करतील. बॅंक बॅलेन्समध्ये दुपटीने वाढ होईल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
2026 मध्ये जुळून येणाऱ्या हंस आणि मालव्य राजयोगामुळे तुमचा सुवर्णकाळ लवकरच सुरु होईल. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता. तसेच, तुम्हाला आवडणारी कामे करु शकता. विवाहितांसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, या कालावधीत तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :


















