एक्स्प्लोर

Astrology Year Ender : 2025 मध्ये राहूची चाल बदलणार; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, पाण्यासारखा पैसा जाणार वाया

Rahu Gochar 2025 : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल, हा काळ काही राशींसाठी धोक्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

Rahu Gochar 2025 : नवग्रहांमध्ये राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. ग्रहांच्या राशी बदलामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. राहू सुमारे दीड वर्षांनी आपली राशी बदलतो. 2024 मध्ये राहू मीन राशीत होता, पण 2025 मध्ये राहू त्याची राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करेल. राहू नेहमी उलट गतीने फिरतो. याचा काही राशींना मोठा फटका बसतो, तर काही राशींसाठी हा काळ नशीब पालटणारा ठरतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, मायावी ग्रह राहू शनीच्या कुंभ राशीत जाणार आहे. 18 मे 2025 रोजी सायंकाळी 5:08 वाजता राहू ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील 18 महिने या राशीत राहून, 5 डिसेंबर 2026 रोजी तो राशी बदलेल. या काळात काही राशींवर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

या राशीच्या लोकांनी वर्षाच्या मध्यापासून सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमच्या कामाचं श्रेय दुसरं कोणी घेऊ शकतं. यासोबतच, तुम्ही प्रत्येक कामात शॉर्टकटचा अवलंब करण्याचा प्रयत्न कराल, परंतु थोडं सावध राहा, कारण ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला कौटुंबिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही थोडे तणावात राहू शकता. पालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रत्येक कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांना नवीन वर्षात संमिश्र परिणाम दिसू शकतात. प्रेम जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत तुमच्या नात्यात खूप तणाव निर्माण होऊ शकतो. पण तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलून ते संपवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा हे मतभेद लक्षणीय वाढू शकतात. राहूच्या संक्रमणामुळे व्यवसाय तसेच नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी थोडं सावध राहावं. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर, राहुमुळे तुम्ही काही अनैतिक काम करू शकता ज्यामुळे तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. व्यवसायात काही नवीन योजना आखू शकता, याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.

मीन रास (Pisces)

राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, या काळात मीन राशीचे लोक अनेक आजारांना बळी पडू शकतात. तुमचं आरोग्य ठिक नसल्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्चामुळे त्रस्त राहू शकता. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. पण राहू काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ धांदलीचा असेल. यासोबतच काही समस्या निर्माण होऊ शकतात. दुसऱ्याच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करण्याची गरज नाही, याने फक्त तुमचं नुकसान होईल. प्रत्येक पावलावर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : यंदाची मोक्षदा एकादशी 3 राशींसाठी ठरणार खास; 11 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतलाAmbadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम; सरकार रोमान्स करण्यासाठी देतंय सुट्टी
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Embed widget