Rahu Gochar 2025 : राहूचा शनीच्या राशीत होणार प्रवेश, 18 मे पासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; करिअरला मिळणार नवी दिशा
Rahu Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीत राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे राहूच्या संक्रमणाचा काही राशींवर परिणाम होणार आहे.

Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला सर्वात पापी ग्रह म्हणतात. त्याचबरोबर, राहू ग्रह (Rahu Gochar) एका राशीत जवळपास 18 महिन्यापर्यंत संक्रमण करतात. राहू ग्रह सध्या मीन राशीत विराजमान आहे. तर, 18 मे 2025 पर्यंत राहू आपला मित्र ग्रह शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत संक्रमण करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीत राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे राहूच्या संक्रमणाचा काही राशींवर परिणाम होणार आहे. या राशींचे अच्छे दिन लवकरच सुरु होणार आहेत. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
राहूचं राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी फार लाभदायक ठरणार आे. कारण राहू ग्रह या राशीच्या कर्म भावात संक्रमण करणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही आर्थिक योजनांचा लाभ घ्याल. समाजात मान-सन्मान मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार सकारात्मक ठरणार आहे. राहू ग्रह या राशीच्या सहाव्या चरणात आहेत. त्यामुळे या राशीच्या साहस आणि पराक्रमात वृद्धी होणार आहे. तसेच, या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार मोठ्याने वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. भावा-बहिणींचा तुम्हाला चांगला पाठिंबा लाभेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
राहू ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीसाठी फार लाभदायक ठरेल. या राशीच्या कुंडलीतील भाग्य स्थानी हे संक्रमण होणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ लाभेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. या काळात तुमच्या कुटुंबात धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















