Premanand Maharaj : तंत्र-मंत्र आणि वशीकरणाचा व्यक्तीवर परिणाम होतो? भक्ताच्या प्रश्नाला प्रेमानंद महाराजांचं चकित करणारं उत्तर
Premanand Maharaj : सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये एका भक्ताने त्यांना तंत्र, मंत्र आणि वशीकरण खरंच असतं का? या संदर्भात प्रश्न विचारला.

Premanand Maharaj : राधा-कृष्णाचे भक्त आणि वृंदावन नगरीत स्थित असलेले संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांची जगभरात ख्याती आहे. प्रेमानंद महाराजांची शिकवण आजही समाजात लागू होते. त्यांच्या विचारातून व्यक्तिमत्त्वात सुधारणा तर होतेच पण त्याचबरोबर जीवनाचा सुखद आनंदही घेता येतो.
आपल्याला माहीतच आहे की, प्रेमानंद महाराज यांचे प्रवचन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या प्रवचनाला लोकांचा प्रतिसाद देखील तितकाच मिळतो. प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भाविक वृंदावनात येतात. अनेक सेलिब्रिटीही त्यांचे विचार फॉलो करताना दिसतात.
तंत्र-मंत्र आणि वशीकरणाचा व्यक्तीवर परिणाम होतो?
सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यामध्ये एका भक्ताने त्यांना तंत्र, मंत्र आणि वशीकरण खरंच असतं का? याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो? या संदर्भात प्रश्न विचारला. भक्ताच्या प्रश्नांना उत्तर देत प्रेमानंद महाराज म्हणाले की, मंत्रांमध्ये अशी एक शक्ती आहे की ज्यामुळे व्यक्तीचा विनाश किंवा विजय होतो. मात्र, याचा प्रभाव अशाच लोकांवर होतो जे लोक देवाचं स्मरण करत नाहीत किंवा देवावर विश्वास ठेवत नाहीत. तर, जे लोक देवाप्रती कृतज्ञ असतात. सेवाभाव वृत्ती असते. मनात श्रद्धा असते. अशा लोकांवर या गोष्टीचा सहसा प्रभाव नाही होत. याचं कारण म्हणजे देवाच्या नावातच अपार शक्ती आहे.
ज्योतिष शास्त्राबद्दल प्रेमानंद महाराज म्हणतात...
ज्योतिषशास्त्राबद्दल बोलताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, ज्योतिषशास्त्र ही एक अशी कला आहे की ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत सर्व गोष्टी सांगता येतात. फक्त त्याचं योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















