Pradosh Vrat 2024 : रवि प्रदोष व्रताच्या दिवशी 'या' मुहूर्तावर करा भगवान शंकराची पूजा; जाणून घ्या विधी आणि शुभ मुहूर्त
Pradosh Vrat 2024 : हिंदू पंचांगानुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 15 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या असणार आहे. हा व्रत रविवारच्या दिवशी असल्या कारणाने याला रवि प्रदोष व्रत म्हणतात.

Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला फार महत्त्व आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रत (Pradosh Vrat) ठेवल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. तसेच, यामुळे आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि आनंद येतो.
हिंदू पंचांगानुसार, सप्टेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 15 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या असणार आहे. हा व्रत रविवारच्या दिवशी असल्या कारणाने याला रवि प्रदोष व्रत म्हणतात. या व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व नेमकं काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
रवि प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त
द्रिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. तर, पुढच्या दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजून 10 मिनिटांनी या व्रताची समाप्ती होणार आहे. प्रदोष व्रतात प्रदोष काळ मुहूर्तात भगवान शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
प्रदोष काळ पूजा मुहूर्त
द्रिक पंचांगानुसार, संध्याकाळी 06.26 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 46 मिनिटांपर्यंत प्रदोष काळ पूजा मुहूर्त असणार आहे.
प्रदोष काळ पूजा, विधी
- प्रदोष काळात पहाटे सूर्योदयाच्या आधी उठा.
- त्यानंतर अंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करा.
- या काळात भगवान शंकराच्या नावाचा जप करा.
- त्यानंतर शंकराची विधीवत पूजा करा.
- प्रदोष व्रत काळात संध्याकाळच्या पूजेलाही महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असल्यास, संध्याकाळी पुन्हा स्नान करा.
- त्यानंतर पूजेची तयारी करा.
- कलशमधून शिवलिंगावर जलभर पाणी अर्पण कराल.
- भगवान शंकराची पूजा आराधना करा.
- शिवलिंगावर बेलपत्र, फूल, उळ, यांसारख्या गोष्टी अर्पण करा. पूजा करताना प्रदोष व्रताची कथा ऐका.
- भगवान शंकराच्या मंत्राचा जप करा. या दिवशी शिव मंदिरात जाऊन तुम्ही शंकराची पूजा केली तरी चालेल.
- तसेच, पूजा झाल्यानंतर तुमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागा.
रवि प्रदोष व्रताचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, रवि प्रदोष व्रत हे आरोग्यासाठी देखील अत्यंत लाभदायक आहे. रवि प्रदोष व्रत केल्याने दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Pitru Paksha 2024 : ...यासाठी पितृ पक्षात नवीन वस्तूंची खरेदी करु नये; वाचा शास्त्रात नेमकं काय म्हटलंय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
