Planet Transit in July 2024 : जुलै महिन्यात ग्रहांचा 'चौकार', एक, दोन नाही तर तब्बल चार ग्रहांचं होणार संक्रमण, कोणत्या राशीला मिळणार पुण्य? जाणून घ्या
Planet Transit in July 2024 : ज्योतिषीय गणनेनुसार, जुलै 2024 मध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल चार ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रभाव अनेक लोकांचं भाग्य उजळणार आहे.
Planet Transit in July 2024 : हिंदू धर्ममान्यतेनुसार, ग्रह आणि नक्षत्रांचं फार महत्त्व आहे. असं म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा विशेष नक्षत्रात झाला आहे. आणि ग्रहांचा स्वामी व्यक्तीचं पूर्ण आयुष्य कसं असेल हे ठरवतो. आपल्या आयुष्यात जे काही चांगलं-वाईट घडतं त्यासाठी ग्रहांच्या नक्षत्रालाच जबाबदार मानण्यात येतं.
ज्योतिषीय गणनेनुसार, जुलै 2024 मध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल चार ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रभाव अनेक लोकांचं भाग्य उजळणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणता ग्रह कधी कोणत्या राशीतून बाहेर पडणार आहे.
1. सूर्याचं राशी परिवर्तन
ग्रहांचा राजा सूर्य सध्या मिथुन राशीत विराजमान आहे. मात्र, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी पुष्य नक्षत्र, 2 ऑगस्टला अश्लेषा आणि 16 ऑगस्ट रोजी मघा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्यानंतर सूर्य 16 ऑगस्ट रोजी आपल्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रहाचं हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे.
2. मंगळ ग्रहाचं संक्रमण
मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. मंगळ ग्रह 12 जुलै रोजी संध्याकाळी 06 वाजून 58 मिनिटांनी वृषभ राशीत परिवर्तन करणार आहे. तर, 27 जुलै रोजी रोहिण आणि 16 ऑगस्ट रोजी मार्गशीष नक्षत्रात संक्रमण करणार आहे. तर, पुढच्या महिन्याच्या ऑगस्टमध्ये म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी मंगळ ग्रहाचं मिथुन राशीत संक्रमण होणार आहे.
3. बुध ग्रहाचं संक्रमण
बुध ग्रह म्हणजेच ग्रहांचा राजकुमार ग्रह हा सध्या कर्क राशीत विराजमान आहे. 19 जुलैपर्यंत बुध ग्रह याच राशीत विराजमान राहणार आहे. मात्र, 19 जुलै रोजी सिंह राशीत संक्रमण करणार आहे. बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.
4. शुक्र ग्रहाचं संक्रमण
प्रेम आणि सुख-शांतीचा कारक असा शुक्र ग्रह 7 जुलै रोजी मिथुन राशीतून निघून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. तर, 9 जुलै रोजी पुष्य, 20 जुलैला अश्लेषा आणि 31 जुलै रोजी मघा नक्षत्रात प्रवेश करणार आह. तर, 31 जुलै रोजी सिंह राशीत संक्रमण करणार आहे. या राशी परिवर्तनाचा सर्वात जास्त लाभ मकर राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :