Numerology 8 February 2024 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या
अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? चला जाणून घेऊया, जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
Numerology Today 8 February 2024 : न्यूमरॉलॉजी (Numerology) अर्थात अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? चला जाणून घेऊया, जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 5 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. परंतु जर तुमचा जन्म 15 किंवा 18 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+5 = 6, 1+8 = 9 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 19 असेल, तर 1+9 = 10, 1+0 = 1 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 1 असेल.
मूलांक 1- आज अती घाई करू नका घाईमुळे तुमच्या संकट येण्याची शक्यता आबे. आपल्या मुलांची काळजी घ्या. तसेच दिलेला शब्द पाळा आज तडजोडीची भूमीका घ्यावी लागेल.
शुभ अंक- 52
शुभ रंग- सिल्वर
मूलांक 2 - तणवमुक्त जीवन जगा छोट्या छोट्या गोष्टीची चिंता करू नका. अति विचाराने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आबे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा.
शुभ अंक- 22
शुभ रंग- ग्रे
मूलांक 3 - वेळेचे गांभीर्य ठेवा. सर्वांना आपुलकीने मदत करा. तसेच नात्यातील प्रेमळ धागा जपा. कोणत्याही गोष्टीत उतावळीपण कमी करा. तुमच्या वागण्यात विवेक हवा. स्वावलंबनाचे सूत्र वापरा. खूप दगदग होईल अशी कामे अंगावर ओढून घेऊ नका
शुभ अंक-12
शुभ रंग- हिरवा
मूलांक 4 - तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाही याची काळदी घ्या. जोडीदाराळी नाद वाद होणार नाही याची दक्षता घ्या. घरात समन्वय ठेवा
शुभ अंक- 2
शुभ रंग- क्रीम
मूलांक 5- व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर बराच ताण राहील.आर्थिक नफा होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. काही अनपेक्षित लाभ होण्यची शक्यता आहे. कार्यालयीन कामाचा ताण वाढेल.
शुभ अंक- 15
शुभ रंग- पिवळा
मूलांक 6 - महत्त्वाच्या कामात यश मिळल मात्र त्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागतील. काही अनपेक्षित अडचणी येतील त्यातून मार्ग काढा. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या
शुभ अंक- 3
शुभ रंग- गोल्डन
मूलांक 7 - आनंदाची बातमी मिळेल. जुन्या मित्रांशी संवाद साधा. कौटुंबिक जीवनात तणाव वाढब शकतो कालजी घ्या. वैवाहित जीवन आनमदात असेल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही शारीरिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका
शुभ अंक- 27
शुभ रंग- वॉयलेट
मूलांक 8 - विदेशात जाण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्याक रस वाढेल.धर्म कर्माच्या बाबतीत रस वाढेल पण विनाकारण खर्च देखील वाढेल. मुलांकडून बातमी मिळेल. अनावश्यक खर्चांपासून बचाव करा. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कही समस्यांचा सामना करावा लागतो
शुभ अंक- 14
शुभ रंग- लाल
मूलांक 9 - करिअरमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात चढ उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या
शुभ अंक- 12
शुभ रंग- लेमन
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)