![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Numerology Today 3 March 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ! अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण; धनप्राप्तीचेही योग
Numerology Today 3 March 2024 : आजचा दिवस अनेक जन्मतारखेच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे? तुमचा आजचा दिवस कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य.
![Numerology Today 3 March 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ! अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण; धनप्राप्तीचेही योग Numerology Today 3 March 2024 aajche ank jyotish these birth date of people will have a good day today also get success and money on sunday ank shastra marathi moolank Numerology Today 3 March 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ! अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण; धनप्राप्तीचेही योग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/08/ffb9f36ab1a941f0f27adda20601a51b170735784975189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Today 3 March 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आजचा दिवस प्रियकरासोबत रोमँटिक असेल आणि तुम्ही शक्य तितका वेळ एकत्र घालवाल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा एखादा भाग देखील मिळू शकतो. आज तुम्हाला सुट्टी नसेल तर ऑफिसमध्ये तुमची कामगिरी चांगली राहील. सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 20 मिनिटं उद्यानात चालणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त असणार आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. तसेच भूतकाळातील गोष्टीत राहणं आणि जोडीदाराशी वाद घालणं टाळा. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं टाळलेलंच बरं.आज आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांचं लव्ह लाईफ आज चांगलं असेल. फक्त घरातील कामावर लक्ष केंद्रित करा. करिअरशी संबंधित सर्व समस्या नीट हाताळा. जीवनात समृद्धी येईल, पण खर्चही तितकेच वाढतील. आज तुमची अडकलेली सर्व कामं पूर्ण होतील. महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला मागील काही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. काही लोकांना मानसिक तणाव जाणवेल आणि ते मायग्रेनची तक्रार करू शकतात.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. आज तुम्ही घरच्या कामात खूप व्यस्त असाल. तुमच्या लव्ह लाईफची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रियकराच्या संपर्कात येऊ शकता. आज बाहेरचं खाणं टाळा, घरच्या जेवणाला प्राधान्य द्या.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेले लोक आज त्यांच्या सर्व निर्णयांत त्यांच्या जोडीदाराचा सल्ला घेतील. दिवसाची सुरुवात हलका व्यायाम किंवा योगासनांनी करा. व्यावसायिक निर्णय जबाबदारीने घ्या. तुम्हाला भविष्यासाठी पैसे वाचवण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात किरकोळ भांडणं होतील.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. काही लोक फ्रीलान्सिंग किंवा अर्धवेळ व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही व्यावसायिक आज कामासाठी खूप प्रवास करतील. खेळताना लहान मुलांना किरकोळ दुखापत होऊ शकते.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांना आज अनेक स्त्रोतांतून चांगला पैसा मिळेल. ऑफिस रोमान्सपासून दूर राहा, यामुळे कौटुंबिक जीवन तसेच व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. एखादा मित्र किंवा भावंड आर्थिक मदतीसाठी विचारू शकतात. शरीरात पोशक घटकांची कमतरता भासू देऊ नका.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकता. आज तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. नुकताच ब्रेकअप झालेले लोक पुन्हा नात्यात येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. वृद्धांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)