Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात
Numerology : काही लोक चांदीचा चमचा घेऊनच जन्माला येतात. तर, काही लोक वयाच्या ठराविक टप्प्यावर यशस्वी होतात. अंकशास्त्रात, अशा काही मूलांकाबद्दल सांगितलं आहे.

Numerology : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात, व्यक्तीच्या राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव , त्याच्या आवडी निवडीचा अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीचा स्वभाव, कल्पनाशक्तीचा अंदाज लावला जातो.
आपण आपल्या आयुष्यात कधीना कधी हा विचार नक्कीच करतो की आपली चांगली वेळ कधी येणार? अनेकदा लोक वयाच्या 20-22 व्या वर्षी दिवस-रात्र मेहनत करुन यशस्वी होत नाहीत. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या नशिबाचा एक ठराविक काळ असतो.
काही लोक चांदीचा चमचा घेऊनच जन्माला येतात. तर, काही लोक वयाच्या ठराविक टप्प्यावर यशस्वी होतात. अंकशास्त्रात, अशा काही मूलांकाबद्दल सांगितलं आहे जे वयाच्या तिसाव्या वर्षानंतरच यश संपादन करतात. याच्या तिशीनंतर त्यांचा सुवर्णकाळ सुरु होतो. या जन्मतारखा नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मूलांक 3
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे.
मूलांक 3 असणारे लोक लहानपणापासूनच बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाचे असतात. मात्र, वयाच्या विशीत आणि तिशीत त्यांच्या वाट्याला फार संघर्षाचा सामना करावा लागतो. अनेकदा यांच्या मेहनतीचं क्रेडिट दुसरेच घेतात. मात्र, जसे हे तिशीत प्रवेश करताच यांच्या नशिबाने यूटर्न घेतलेला असतो. यांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसते.
मूलांक 5
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल तर अशा लोकांचा मूलांक 5 असतो. या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे. हा बुद्धी आणि व्यवसायाचा कारक ग्रह आहे. या जन्मतारखेचे लोक स्वभावाने थोडे चंचल असतात. सुरुवातीच्या टप्प्यात हे एका जागी कामावर टिकत नाहीत. मात्र, वयाच्या तिशीनंतर यांच्यातला सामंजस्यपणा वाढतो.
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. या मूलांकाचा स्वामी शनि ग्रह आहे. अंकशास्त्रात मूलांक 8 ला सर्वात जास्त संघर्ष आणि त्यानंतर
शनिदेव घेतात कठीण परीक्षा
या जन्मतारखेच्या लोकांची वयाच्या तिथीपर्यंत शनि देव घेतात कठीण परीक्षा. या लोकांना प्रत्येक कामात दिरंगाईचा सामना करावा लागतो. मात्र, वयाच्या तिशीनंतर यांनी केलेल्या मेहनतीचं फळ यांना मिळतंच.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Shani Nakshatra Parivartan 2026 : जुलै महिना सुरु होताच शनिचा रेवती नक्षत्रात प्रवेश; कर्कसह या 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा, कर्माचं पुण्य फळ मिळणार



















