Numerology Of Mulank 5 : शब्दांचे धनी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ते म्हणतील तीच असते पूर्व दिशा, 90 टक्के सल्ले ठरतात खरे
Numerology Of Mulank 5 : ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे.

Numerology Of Mulank 5 : ज्योतिष शास्त्रात, जसे राशीला महत्त्व आहे. तसेच, अंकशास्त्रात (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेला महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एखाद्याच्या राशीनुसार माणसाचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन देखील व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी निवडी कळतात. या ठिकाणी आपण मूलांक 5 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूलांक ठरवला जातो. या ठिकाणी कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह हा बुद्धी, वाणी, तर्क, व्यवसाय आणि त्वचेचा कारक ग्रह मानला जातो. या जन्मतारखेचे लोक फार हुशार असतात. तसेच, आपल्या वाणीने इतरांना प्रभावित करतात.
शब्दाचे असतात जादूगार
अंकज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक फार बुद्धिमान असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचा ते मोठ्या धैर्याने सामना करतता. तसेच, त्यावर विजयही मिळवतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक फार साहसी आणि पराक्रमी असतात. या जन्मतारखेचे लोक शब्दाचे जादूगार असतात. कारण हे लोक आपल्या बोलीने इतरांना आकर्षित करतात. यांची बोलण्याची पद्धत इतरांपेक्षा फार वेगळी आणि खास असते. आपल्या आकर्षक बोलीने हे लोक कोणाकडूनही आपलं काम करुन घेऊ शकतात.
नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये जास्त रमतात
या जन्मतारखेचे लोक नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये जास्त यश संपादन करतात. यांच्यामध्ये रिस्क घेण्याची क्षमता असते. तसेच, कोणत्याही गोष्टीला हे लोक लगेच घाबरत नाहीत. या जन्मतारखेचे लोक चांगले राजकीय नेते, यशस्वी व्यापारी तसेच, चांगले कलाकार असतात. यांना अर्थशास्त्र आणि संगीताचं देखील विशेष ज्ञान असतं. तसेच, यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक जे काही बोलतात ते 90 टक्के खरं असतं. त्यामुळे लोकांचा यांच्यावर लगेच विश्वास बसतो.
पैशांची नसते कमी
या जन्मतारखेच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, या लोकांना पैसा कसा कमवायचा याची जाण असते. यामुळे यांना आयुष्यात कधी पैशांची कमतरता नसते. आपल्या बुद्धीच्या जोरावर हे पैसा कमावतात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















