Numerology : प्रचंड भांडखोर असतात 'या' जन्मतारखेचे लोक, पटकन येतो यांना राग; पण मैत्रीत असतात तितकेच पक्के
Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 आहे.

Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 4 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 आहे. या ठिकाणी राहू ग्रहाच्या प्रभावामुळे या जन्मतारखेचे लोक थोडे भांडखोर आणि रागीष्ट स्वभावाचे असतात. तापट स्वभाव असल्यामुळे या लोकांना कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणाने राग येतो. त्याचप्रमाणे मूलांक 4 ची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
वेळेनुसार स्वत:ला बदलत नाहीत
या जन्मतारखेच्या लोकांचा एक नकारात्मक गुणधर्म असा आहे की, या लोकांना वेळेनुसार, स्वत:मध्ये बदल करत नाहीत. त्यामुळेच या लोकांचे मित्र फार कमी असतात. तसेच, या जन्मताखेचे लोक पैसे खर्च करण्याच्या बाबतीतही मागे-पुढे पाहात नाहीत. त्यामुळे यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. या लोकांच्या नाकाच्या शेंड्यावरच राग असतो. त्यामुळेच हे कोणत्या ना कोणत्या वादा सापडतात. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळेच धनवान बनण्यासाठी यांना नेक संकटांचा सामना करावा लागतो.
'ही' आहे यांची खासियत
ज्या लोकांचा मूलांक 4 असतो. अशा लोकांना ,सामाजिक क्षेत्राची विशेष आवड असते. हे लोक इतरांना लाभ देतात. पण, मनात कधीच स्वार्थी भाव ठेवत नाहीत. तसेच, या जन्मतारखेचे लोक आपल्या गोष्टी इतरांबरोबर कधीच शेअर करत नाहीत. तसेच, पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र, यांच्या डोक्यात एकाच वेळी बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. या जन्मतारखेच्या लोकांची तर्क-वितर्क क्षमता फार चांगली असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















