(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Numerology : शनिला प्रिय असतात 'या' जन्मतारखेचे लोक; प्रत्येक अडचणीचा धैर्याने करतात सामना; मेहनतीचं मिळतं फळ
Numerology Of Moolank 8 : मूलांक 8 राशीच्या लोकांना शनिदेवाची विशेष कृपा असते. या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप अंतर्मुख असतात.
Numerology Of Moolank 8 : ज्योतिष अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक मूळ संख्येला विशेष महत्त्व आहे. पण, त्यातही मूलांक क्रमांक 8 हा खूप खास आहे. याचं कारण म्हणजे मूलांक 8 हा शनिचा अंक आहे. अंक 8 हा कर्म देणारा अंक मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला होतो त्यांचा रेडिक्स क्रमांक 8 असतो.
मूलांक 8 राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप अंतर्मुख असतात. या लोकांना संसाराच्या गजबजाटापासून दूर एकांतात राहायला आवडतं. मूलांक 8 असलेल्या लोकांमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी असतात ते जाणून घेऊ.
शनि कष्टाचे फळ देईल
मूलांक 8 चे लोक कठोर परिश्रम करायला कधीच घाबरत नाहीत. यामुळेच शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळही देतात. हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्याने सामना करतात. या लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो पण हळूहळू ते यशाच्या पायऱ्या चढतात.
जबाबदारी घेण्यास घाबरत नाहीत
8 व्या क्रमांकाच्या लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता असते. हे लोक इतरांना प्रेरणा देतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करतात. या रॅडिक्स नंबरचे लोक टीमवर्कवर विश्वास ठेवतात. कोणतीही जबाबदारी अगदी सहजपणे पेलतात. हे लोक दृढनिश्चयी आणि शिस्तप्रिय असतात. कोणतंही काम करताना स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देतात. आपल्या वेळेचा पूरेपूर वापर करतात. तसेच, पैशांची गुंतवणूकही फार सांभाळून करतात. विनाकारण पैशांचा गैरवापर या मूलांकाचे लाक करत नाहीत.
प्रेम संबंध टिकत नाहीत
8 व्या क्रमांकाच्या लोकांचे प्रेम संबंध जास्त काळ टिकत नाहीत. अनेक वेळा हे लोक एकतर्फी प्रेमात राहतात. साधारणपणे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतात त्यामुळे लग्नाला बराच उशीर होतो. तसेच, त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहते. हे लोक आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांना मूलांक 3, 4, 5, 7 आणि 8 या राशीच्या लोकांबद्दल अधिक आपुलकी असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: