एक्स्प्लोर

Numerology : भगवद्गीतेपासून ते मतदानापर्यंत... मूलांक 9 आहे अतिशय खास; पंतप्रधान मोदींनीही संसदेत शपथविधी दरम्यान सांगितलं महत्त्व

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाची एक वेगळी खासियत आहे, यात मूलांक 9 चं महत्त्व विशेष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज संसदेत मूलांक 9 चं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 9, 18 किंवा 27 जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 9 असतो.

Numerology Mulank 9 :  अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यामध्ये मूलांक क्रमांक 9 असलेल्या मुलींना खूप खास समजलं जातं. आज संसदेतील शपथविधीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मूलांक 9 चं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 9, 18 किंवा 27 क्रमांकाचा मूलांक 9 असतो. यातील 18 क्रमांकाचं महत्त्व सांगताना मोदी काय म्हणाले? पाहूया

भारतीय संस्कृतीत 18 क्रमांकाला फार महत्त्व - पंतप्रधान मोदी

संसदेच्या शपथविधी दरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते, यावेळी त्यांना 18 क्रमांकाचं महत्त्व सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, "18व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या जास्त आहे. भारतीय संस्कृतीत 18 क्रमांकाला फार महत्त्व आहे. गीतेत देखील 18 अध्याय आहेत. आपल्याकडे पुराणांची आणि उपपुराणांची संख्या देखील 18 आहे. 18 नंबरचा मूलांक 9 आहे आणि 9 मूलांक पूर्णतेची खात्री देतो. 9 पूर्णतेचं प्रतीक आहे. वयाच्या 18 व्या वर्षी आपल्याकडे मतदानाचा अधिकार मिळतो. 18 वी लोकसभा देखील भारतासाठी शुभ संकेत आहे."

कसे असतात मूलांक 9 चे लोक?

मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे. या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही स्वभावाचे असतात. या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते, त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. हे लोक जीवनात खूप पैसे कमावतात, त्यांच्याकडे जमीन आणि संपत्तीही भरपूर प्रमाणात असते. 

संपत्तीच्या बाबतीत असतात सरस

कोणत्याही महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ते स्वत:च्या मेहनतीवर अवघं साम्राज्य उभं करतात. हे लोक बराच जमीन-जुमला आणि संपत्ती खरेदी करुन ठेवतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना आर्थिक लाभ मिळतो. 

शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात

9 मूलांकाचे लोक उच्च शिक्षण घेतात, ते शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात आणि चांगलं शिक्षण घेतात.

खूप धाडसी असतात या मुली

9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक खूप धाडसी असतात, धाडसी गोष्टी करायला त्यांना खूप आवडतं. या लोकांना कधीही कसली भीती वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Numerology : अत्यंत निरागस असतात 'या' जन्मतारखेचे लोक; फसवणूक, कपटीपणा यांच्या रक्तातच नाही, एखाद्याचं षडयंत्रही यांना समजत नाही 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget