Nirjala Ekadashi 2025 : निर्जला एकादशी 'या' 3 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; भगवान विष्णूच्या कृपेने सर्व संकटं होतील दूर
Nirjala Ekadashi 2025 : यंदा निर्जला एकादशी 6 जून 2025 रोजी असणार आहे. यामध्ये सर्वात वैशिष्ट्य म्हणजे यंदाची निर्जला एकादशी काही राशींच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे.

Nirjala Ekadashi 2025 : हिंदू धर्म शास्त्रानुसार, एकादशीचं व्रत फार खास मानलं जातं. मात्र, सर्व एकादशींमध्ये सर्वात कठीण आणि पुण्यदायी व्रत हा निर्जला एकादशीचा आहे. या व्रतामध्ये पाणी ग्रहण नाही करत. त्यामुळे याला निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) म्हणतात. यंदा निर्जला एकादशी 6 जून 2025 रोजी असणार आहे. यामध्ये सर्वात वैशिष्ट्य म्हणजे यंदाची निर्जला एकादशी काही राशींच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी निर्जला एकादशी फार शुभ मानली जाते. या दिवशी ग्रह नक्षत्रांची स्थिती फार चांगली असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, नोकरदार् वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी निर्जला एकादशी फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. या दरम्यान समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. देवी लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना निर्जला एकादशीचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात कोणाशीही वादविवाद करु नका. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















