Hindu Religion: काय सांगता! 2025 वर्ष पूर्ण होऊन आधीच 57 वर्षे झालीयत? आताचं वर्ष हे 2082 आहे? हिंदू धर्मात काय म्हटलंय?
New Year 2025: भारतासह जगभरात 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले गेले तरी, हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरू व्हायला अजून अवधी आहे. हिंदू धर्मानुसार, 2025 वर्ष आधीच 57 वर्षे पूर्ण झाली आहे?
Hindu New Year 2025: 2024 वर्ष संपून 2025 नववर्षाला सुरूवात झालीय. नववर्षाचं स्वागत भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात करण्यात आलं. पाश्चिमात्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष हे 1 जानेवारीला साजरे केले जाते. पण तुम्हाला माहितीय का? पश्चिमेकडे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे जे भारताच्या हिंदू कॅलेंडरपेक्षा खूप वेगळे आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हे वर्ष 2082 असेल. याचे कारण काय? तसेच हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरू व्हायला अजून अवधी आहे. हिंदू नववर्षाला कधी सुरू होणार? जाणून घ्या..
हिंदू कॅलेंडरनुसार हे वर्ष 2082 असेल?
पश्चिमेकडे ग्रेगोरियन कॅलेंडर आणि हिंदू कॅलेंडर या दोन कॅलेंडरमध्ये 57 वर्षांचा फरक आहे. जर तुम्हाला सोप्या भाषेत समजले तर, यावेळी 2025 हे वर्ष 1 जानेवारीपासून सुरू झाले आहे, परंतु हिंदू कॅलेंडरनुसार हे वर्ष 2082 असेल. मात्र, हिंदू कॅलेंडरनुसार सध्या 2081 हे वर्ष सुरू आहे. भारतासह जगभरात १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जात असले तरी हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरू व्हायला अजून अवधी आहे.
2025 मध्ये हिंदू नववर्षाची तारीख
2025 मध्ये, हिंदू नववर्ष गुढीपाडवा या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी साजरे केले जाईल, जेव्हा चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू होईल. हिंदू कॅलेंडरनुसार, वर्ष विक्रम संवत 2082 असेल. हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होते. ही तारीख हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.
हिंदू कॅलेंडरचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. हे सम्राट विक्रमादित्य यांनी 57 ईसा पूर्वमध्ये सुरू केले होते, जे आता भारतातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय संवत्सरांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीची सुरुवात हिंदू नववर्षाने होते, जे दुर्गा देवीच्या उपासनेचे आणि नवीन संकल्पांचे प्रतीक मानले जाते. हा दिवस महाराष्ट्र आणि गोव्यात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतात तो उगादी म्हणून साजरा केला जातो आणि सिंधी समाजात तो भगवान झुलेलालच्या पूजेने चेटीचंद म्हणून साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीसह, सूर्य उत्तरायण राहतो, जो हिंदू धर्मात एक शुभ काळ मानला जातो. या दिवसापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात.
हेही वाचा>>
Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)