Job Totke : नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत? करा 'या' सहा युक्त्यांचा अवलंब मिळवता येते
Job Totke : अनेक वेळा नोकरी मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर संधी हातातून निसटते. यामागे वास्तु आणि ग्रह दोष असू शकतात. ज्योतिष शास्त्र सांगते की कर्मासोबत ग्रह तुमच्या अनुकूल असणे खूप महत्वाचे आहे.
Job Totke : स्पर्धेच्या या युगात आजकाल चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. काही वेळा पात्रता असून देखील नोकरी मिळणे कठीण होते. अनेक वेळा नोकरी मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर संधी हातातून निसटते. यामागे वास्तु आणि ग्रह दोष असू शकतात. ज्योतिष शास्त्र सांगते की कर्मासोबत ग्रह तुमच्या अनुकूल असणे खूप महत्वाचे आहे. नोकरी मिळण्यात अडथळे येत असतील तर काही युक्त्या अवलंबून त्यावर मात करू शकता.
शास्त्रानुसार नोकरी मिळवण्यासाठी गाईची सेवा सांगितली आहे. मुलाखतीला जाताना गाईला हाताने गूळ किंवा हरभरा खायला द्या. त्यामुळे नोकरीच्या संधी वाढतात.
असे मानले जाते की महिन्याच्या पहिल्या सोमवारी काळे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून माँ कालीला अर्पण केल्यास लवकरच नोकरी मिळू शकते.
नोकरी मिळण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी सात प्रकारची धान्ये पक्ष्यांना खायला द्यावीत.
ज्यांना इच्छित नोकरी मिळवायची आहे त्यांनी प्रत्येक शनिवारी 'ओम शनिश्चराय नमः' चा 108 वेळा जप करावा. यामुळे नोकरीत येणारे अडथळे दूर होतील आणि यश मिळू शकेल.
असे मानले जाते की नोकरीसाठी लिंबाची युक्ती केल्यास यश मिळू शकते. यासाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी एका लिंबाच्या चारही दिशांना चार लवंगा टाका. यासोबत 'ओम श्री हनुमंते नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा आणि नंतर तो आपल्याजवळ ठेवा. मुलाखतीत सोबत घेऊन जा.
जर तुम्ही अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहात आणि अनेक ठिकाणी हात आजमावला आणि अपयशी ठरला असेल तर यासाठी 12 मुखी रुद्राक्षाची माला धारण करणे चांगले मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :