Nag Panchami 2024 : नागपंचमीच्या दिवशी चुकूनही 'हे' काम करु नका;अन्यथा 'या' गोष्टींची नेहमी भासेल कमतरता
Nag Panchami 2024 : नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवाची घरोघरी पूजा करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धन-संपत्तीत वाढ होते असं म्हणतात.
Nag Panchami 2024 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, नागराजाला देवतेच्या रुपात मानले जाते. वर्षभरात असा एक सण येतो ज्या दिवशी नागराजाची मनोभावे पूजा केली जाते. त्यानुसार, श्रावण (Shravan) महिन्यातील शुक्ल पक्षच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा (Nag Panchami) सण साजरा केला जातो. यंदा हा सण 09 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवाची घरोघरी पूजा करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धन-संपत्तीत वाढ होते असं म्हणतात. तसेच, सर्पदंशाची भीती दूर होते. तसेच, या दिवशी असे अनेक कार्य आहे जे चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो. ते नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
नागपंचमी 2024 पूजा मुहूर्त
यंदा नाग पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल.
नागपंचमी का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, त्याचा मुलगा जनमेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला. ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं रक्षण झालं. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला.
नागपंचमीच्या दिवशी चुकूनही 'हे' उपाय करु नका
- नागपंचमीच्या दिवशी चुकूनही सापाला मारू नये. जर तुम्ही या दिवशी सापाला मारलं तर याचा परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण वंशावळी होण्याची शक्यता असते.
- नागपंचमीच्या दिवशी चुलीवर जेवण बनविण्यासाठी तवा आणि कढईचा उपयोग करु नये. असं केल्याने नागदेवतेला त्रास होतो.
- तसेच, नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाणकाम करु नये. असं म्हणतात की, जमीनीत सापांचं बीळ असतं. जमिनीचं खोदकाम केल्याने सापांचं घर नष्ट होऊ शकतं. यामुळे तुम्हाला दोष होऊ शकतो.
- धार्मिक शास्त्रानुसार, नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करु नये. जसे की, सुरी, चाकू, टाचणी इ. हे सर्व अशुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :