Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 'या' 4 शुभ मुहूर्तात करा स्नान-दान; सर्व पापांपासून मिळेल मुक्ती, मिळणार दुप्पट लाभ
Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येच्या दिवशी शुभ मुहूर्तात स्नान-दानासह पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान, तसेच, श्राद्धसुद्धा केलं जातं. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते
Mauni Amavasya 2025 : हिंदू धर्मात सोमवती आणि मौनी अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करणं फार शुभदायी मानलं जातं. सध्या महाकुंभ मेळ्याचं दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्येच्या दिवशी केलं जातं. असं म्हणतात, या दिवशी शुभ मुहूर्तात स्नान-दानासह पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान, तसेच, श्राद्धसुद्धा केलं जातं. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. त्याचप्रमाणे, अशीही मान्यता आहे की, या दिवशी शुभ मुहूर्तात हे सर्व कार्य केल्याने व्यक्तीला दुप्पट लाभ मिळतो.
कधी आहे मौनी अमावस्या?
हिंदू पंचांगानुसार, मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी ब्रह्म मुहूर्तावर 5 वाजून 25 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा ब्रह्म मुहूर्त 6 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या मुहूर्तात स्नान आणि दान करणं फार शुभ मानलं जातं. जर एखादी व्यक्ती शुभ मुहूर्तात स्नान किंवा दान करु शकत नाही तर सुर्योदय किंवा सूर्यास्तापर्यंत कधीही स्नान आणि दान करु शकतात.
मौनी अमावस्येला स्नानाचं महत्त्व
मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्याबरोबरच लोक पितरांचं तर्पण किंवा पिंडदानसुद्धा करतात. अशी मान्यता आहे की, या दिवशी पितर पृथ्वीवर येतात. यासाठी या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करणं शुभ मानलं जातं. या व्यतिरिक्त मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
महाकुंभ 2025 अमृत स्नानाची तिथी
- मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 तिसरं अमृत स्नान होणार आहे.
- वसंत पंचमी 3 फेब्रुवारी 2025 चौथं अमृत स्नान
- माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी 2025 पाचवं अमृत स्नान
- महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 च्या दिवशी शेवटचं अमृत स्नान होणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: