Zodiac Signs : मंगळ-शनि युतीमुळे 17 मे पर्यंत 'या' तीन राशींचे मोठे नुकसान होईल, करा हे उपाय
Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि शनि हे दोन शत्रू ग्रह 29 एप्रिल ते 17 मे पर्यंत एकाच राशीत राहून संयोग घडवत आहेत.
Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि शनि हे दोन शत्रू ग्रह 29 एप्रिल ते 17 मे पर्यंत एकाच राशीत राहून संयोग घडवत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09:57 वाजता शनिने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तेथे मंगळ आधीच उपस्थित होता. कुंभ राशीत मंगळ आणि शनि यांच्या संयोगामुळे “द्वेले योग” तयार झाला आहे. जो ज्योतिष शास्त्रात अत्यंत अशुभ योग मानला जातो. या संयोगामुळे या तीन राशीच्या लोकांना खूप त्रास होईल.
कर्क : कर्क राशीच्या आठव्या घरात शनि-मंगळाचा योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात आठवे घर हे वय, धोका आणि अपघाताचे घर मानले जाते. यासाठी अपघाताला सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी कोणताही धोका टाळावा. हे संयोग कोणत्याही प्रकारची अनुचित घटना दर्शवत आहे.
कन्या : या राशीच्या सहाव्या घरात शनि-मंगळाचा योग आहे. हे घर कर्ज, शत्रू, आरोग्य, व्यवसाय आणि कष्टाचे घर आहे. त्यामुळे या राशिच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खाण्यात काळजी घ्या. तब्येत बिघडल्यामुळे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. लवकर थकवा आणणारे काम करणे टाळा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर शनि-मंगळाच्या युतीचा अधिक प्रभाव राहील. यासाठी या लोकांनी सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार येऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावात राग, चिडचिड आणि उद्धटपणाचा प्रभाव राहील. जोडीदार आणि सहकाऱ्याशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.
मंगळ-शनि संयोगासाठी हे उपाय करा
मंगळ आणि शनीच्या संयोगाने प्रभावित झालेल्या लोकांनी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावं. शनि आणि मंगळाच्या शांतीसाठी शनि मंत्रांचा जप करावा. या संयोगाने प्रभावित झालेल्या लोकांनी शनि आणि मंगळाशी संबंधित वस्तूंचे दान करावे. हिंदू धर्मात शनि आणि मंगळ ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी यज्ञ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा यज्ञ शुभ आणि फलदायी आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :