Marriage Remedies : बरेच प्रयत्न करूनही लग्न जुळता जुळेना? आत्ताच राशीनुसार करा 'हे' उपाय; लवकरच जुळून येतोय शुभ विवाह योग
Marriage Remedies : लग्नात काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला योग्य जीवनसाथी मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्रातील हे उपाय तुम्हाला चांगली मदत करू शकतात. लग्नात काही अडचण येत असेल तर राशीनुसार हे उपाय अवश्य करा, तुम्हाला काही दिवसांच शुभ परिणाम पाहायला मिळतील.
Marriage Remedies : तुमच्या ओळखीतही असे अनेक लोक असतील ज्यांना लग्न करायचं आहे पण त्यांचं लग्न काही जमत नाहीये. काहींना योग्य जोडीदार मिळत नसेल, काहींना जास्त वयामुळे अडचणी येत असतील, तर काहींना विवाहात अन्य काही अडचणींचा सामना करावा लागत असेल.
ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या कुंडलीतील सातवं घर हे विवाहाचं असतं. सातव्या घराचे कारक ग्रह शुक्र (Venus) आणि गुरु (Jupiter) आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र आणि गुरूची स्थिती योग्य नसते तेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. अशा स्थितीत, तुम्ही तुमच्या राशीनुसार उपाय केल्यास या सर्व समस्या लवकरच दूर होतात. लवकर लग्न ठरण्यासाठी राशीनुसार कोणते उपाय (Remedies) करावेत? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शिवमंदिरात जाऊन गौरी देवीला गूळ अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून त्याच गुळाचा स्वीकार करावा, यामुळे विवाहाची शुभवार्ता लवकरच मिळू शकते.
वृषभ रास (Taurus)
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी गौरीला पिंपळाचं पान अर्पण करावं, असं केल्याने विवाहाशी संबंधित समस्या दूर होतील आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता वाढते.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी देवी गौरीला हिरव्या रंगाचा धागा अर्पण करावा आणि नंतर तो आपल्याजवळ ठेवावा. असं केल्याने तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पिंपळाच्या पानावर सिंदूर लावून गौरी देवीला अर्पण करावं, असं केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि माता गौरीच्या कृपेने विवाहाची शुभ शक्यता निर्माण होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, म्हणून सिंह राशीच्या लोकांनी गौरीला लाल धागा अर्पण करावा आणि नंतर तो धागा आपल्याजवळ ठेवावा. असं केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी 'ओम गौरी शंकराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा . असं केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मंगळा गौरीला मसूर डाळ अर्पण करावी आणि त्यानंतर मसूर डाळीचे काही दाणे स्वतःजवळ ठेवावे. असं केल्याने ज्यांचं लग्न होत नाही त्यांचं लवकरच लग्न होईल आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी रोज संध्याकाळी चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्याने लवकरच विवाह योग निर्माण होतील आणि सर्व अडचणी दूर होतीत.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीचा स्वामी बृहस्पति आहे, त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी रोज मंगळा गौरी स्तोत्राचं पठण करावं. असं केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
मकर रास (Capricorn)
शनि हा मकर राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन देवी मंगळा गौरीला लाल ओढणी अर्पण करावी. असं केल्याने जीवनात सकारात्मकता येईल आणि लवकरच विवाह होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुपारीच्या पानावर सिंदूर लावून माता गौरीला अर्पण करावे. असं केल्याने देवीची तुमच्यावर विशेष कृपा राहतील आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतील.
मीन रास (Pisces)
बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी मंदिरात देवीच्या चरणी सिंदूर अर्पण करावा. असं केल्याने लग्नात येणाऱ्या समस्या दूर होतील आणि लवकरच विवाह ठरू शकेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :