Shani Vakri 2024 : शनीची वक्री चाल 'या' 3 राशींवर बरसणार; प्रगतीच्या मार्गात येणार खड्डे, हातचा पैसा निघून जाणार
Shani Vakri 2024 : कोणत्याही ग्रहाची जेव्हा उलटी चाल सुरु होते तेव्हा अनेक राशींवर त्याचा अशुभ परिणाम होतो, पण हा काळ काही राशींसाठी नशीब पालटणारा ठरतो. 30 जूनला शनि वक्री झाला आहे, याचा फटका मुख्यत्वे 3 राशींना बसलेला दिसेल.
![Shani Vakri 2024 : शनीची वक्री चाल 'या' 3 राशींवर बरसणार; प्रगतीच्या मार्गात येणार खड्डे, हातचा पैसा निघून जाणार Shani Vakri 2024 negative effects on these zodiac signs will face financial loss money problem career problem shani news marathi Shani Vakri 2024 : शनीची वक्री चाल 'या' 3 राशींवर बरसणार; प्रगतीच्या मार्गात येणार खड्डे, हातचा पैसा निघून जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/4dad351415504c4b2360f079c7cbd6b71719903011646466_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Vakri 2024 : न्यायदेवता शनि (Shani) व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. शनि कधी सरळ चालीत असतो, तर कधी वक्री. शनि सध्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहे.
कुंभ राशीत 15 नोव्हेंबरपर्यंत शनि उलटी चाल चालेल. शनीची उलटी चाल अशुभ मानली जाते. यावेळी काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित समस्या, कायदेशीर वाद आणि कौटुंबिक वाद अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या वक्री स्थितीमुळे कोणत्या राशींना फटका बसणार? जाणून घेऊया.
शनीची चाल 'या' राशींवर पडणार भारी
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती फारच अशुभ ठरणार आहे. शनीच्या उलट्या चालीचा परिणाम तुमच्या कामावर होईल. तुमच्या जीवनात अनेक चढउतार येतील, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असेल. जे लोक व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होईल. या काळात तुमचं जीवन आव्हानांनी भरलेलं असेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी कठीण काळ असेल, या काळात तुम्ही केलेलं काम बिघडू शकतं आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर रागवू शकतात. तसेच, यावेळी या काळात तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.
मकर रास (Capricorn)
या राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या काळात तुमचं काही आर्थिक नुकसान होईल, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. या अडीच महिन्याच्या काळाच त्यांच आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या राशीच्या व्यक्तीने यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)