Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती हा दानाचा पुण्य दिवस; कोणत्या राशीनुसार काय दान कराल? जाणून घ्या
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीचा संबंध केवळ धर्माशीच नाही तर इतर गोष्टींशीही आहे. ज्यामध्ये कृषी क्षेत्रासोबत विज्ञानाचाही संबंध आहे.
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती हा हिंदू धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आहे. मकर संक्रांतीचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच त्याचे वैज्ञानिकदेखील महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा योग येतो. याशिवाय अनेक बदलही येतात. पाल बालाजी ज्योतिष संस्था, जयपूरचे संचालक ज्योतिषाचार्य डॉ. अनिश व्यास यांनी सांगितले की, यावेळी मकर संक्रांती हा दानाचा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल.
या दिवसापासून सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येतो म्हणून याला उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांतीचा संबंध केवळ धर्माशीच नाही तर इतर गोष्टींशीही आहे. ज्यामध्ये कृषी क्षेत्रासोबत विज्ञानाचाही संबंध आहे. मकर संक्रांतीनंतर येणारा पहिला बदल म्हणजे दिवस मोठा होऊ लागतो. तसेच, या दिवसापासून रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य सर्व राशींसाठी लाभदायक आहे, परंतु मकर आणि कर्क राशीसाठी अधिक लाभदायक आहे.
शुभ कार्याला सुरुवात
ज्योतिषी डॉ. व्यास यांनी सांगितले की, मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य पुन्हा सुरू होतील. तसेच, भगवान विष्णूची विशेष पूजा करण्याचा नियमही सांगण्यात आला आहे.
स्नान-दानचं विशेष महत्त्व
या दिवशी पाण्यात तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान करण्याची परंपरा असल्याचे ज्योतिषी डॉ. व्यास यांनी सांगितले. यासोबतच तीळापासून बनवलेल्या वस्तू, कपडे आणि अन्न या सर्व गोष्टी दिवसभर गरजू लोकांना दान कराव्यात. असे केल्याने सर्व प्रकारची पापं नष्ट होतात. विशेषत: मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदान, तीर्थयात्रा आणि गंगास्नान करावे. मंदिरांसह गरजूंना उबदार कपडे दान करण्याबरोबरच गाईंना चारा खाऊ घातल्यास पुण्य मिळते. या दिवसापासून हवामान बदलू लागते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी दान करा
ज्योतिषी आणि जन्मकुंडली विश्लेषक डॉ. व्यास यांनी सांगितले की, मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या दिवशी खिचडी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवसापासून सर्व शुभ कार्यावरील बंदी देखील संपते. या दिवशी खिचडी खाणे आणि खिचडी दान करणे याला फार महत्त्व दिले जाते.
खिचडीचे फायदे
ज्योतिषी विश्लेषक डॉ. व्यास यांनी सांगितले की, मकर संक्रांतीच्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्लेली खिचडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. खिचडीने पचनक्रिया सुरळीत सुरू होते. याशिवाय खिचडीमध्ये वाटाणे आणि आलं मिसळल्यास ते शरीरासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच हे बॅक्टेरियाशी लढण्यासही मदत करते.
डॉ. व्यास यांच्याकडून जाणून घ्या राशीनुसार मकर संक्रांतीला काय दान करावे?
मेष : संक्रांतीला लाल रंगाचे कपडे परिधान करा. तीळ दान करा.
वृषभ : संक्रांतीला शुभ्र वस्त्रे परिधान करा. तसेच लोकरीचे कपडे आणि तीळ दान करा.
मिथुन : पांढरे कपडे घाला. काळे तीळ दान करा.
कर्क : भगव्या रंगाचे कपडे परिधान करा. तीळ, साबुदाणा आणि लोकर दान करा.
सिंह : संक्रांतीला पिवळे कपडे परिधान करा. आपल्या क्षमतेनुसार तीळ, ब्लँकेट दान करा.
कन्या : संक्रांतीला निळे वस्त्र परिधान करा. आपल्या क्षमतेनुसार तीळ, घोंगडी, तेल आणि उडीद डाळ दान करा.
तूळ : संक्रांतीला शुभ्र वस्त्रे परिधान करा. तेल, कापूस, कपडे, मोहरी दान करा.
वृश्चिक : संक्रांतीला लाल वस्त्र परिधान करा. गरजूंना ब्लँकेट आणि लोकरीचे कपडे दान करा.
धनु : संक्रांतीला पिवळे किंवा भगवे कपडे परिधान करा. तीळ आणि हरभरा डाळीचे दान करावे.
मकर : संक्रांतीला निळे किंवा आकाशी रंगाचे कपडे परिधान करा. तेल, तीळ, घोंगडी आणि पुस्तक दान करा.
कुंभ : संक्रांतीला निळे किंवा काळे कपडे परिधान करा. तीळ, साबण, कपडे, कंगवा आणि अन्न दान करा.
मीन : संक्रांतीला पिवळे किंवा गुलाबी कपडे परिधान करा. या दिवशी तीळ, हरभरा, साबुदाणा दान करा.
महत्त्वाच्या बातम्या :
Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय, जीवनातील सर्व समस्या दूर होतील!