Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला बनतोय 'महासंयोग'! या उपायांनी प्रसन्न होतील शिव, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
MahaShivratri 2023: ज्योतिषशास्त्रानुसार 30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला असा दुर्मिळ संयोग घडत आहे, ज्यामध्ये शिवाची पूजा केल्यास लवकर फळ मिळेल.
MahaShivratri 2023: भगवान भोलेनाथ (Lord Shiv) आणि देवी पार्वतीचा (Goddess Parvati) विवाह सोहळा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. असे मानले जाते की, जो या दिवशी पूर्ण भक्तीभावाने शिवशंभूची पूजा करतो, त्याला उत्तम जीवनसाथी मिळतो. धन, संतती आणि आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. यंदाची महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला असा दुर्मिळ संयोग घडत आहे, ज्यामध्ये शिवाची पूजा केल्यास लवकर फळ मिळेल.
30 वर्षांनंतर महाशिवरात्रीचा दुर्मिळ योगायोग
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीला 30 वर्षांनंतर शनि आणि पिता सूर्य दोघेही कुंभ राशीत बसतील. शनि आणि सूर्य यांच्या संयोगामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. दुसरीकडे, शारीरिक सुख आणि सौंदर्याची देवता शुक्र ग्रह, मीन राशीत विराजमान राहील. असे मानले जाते की, कैलास निवासी भगवान शंकराची पूजा केल्याने तुमच्या आयुष्याचे कल्याण होते. ज्यांच्या जन्मपत्रिकेत शनि आणि सूर्य यांच्या संयोगामुळे अशुभ असेल. त्यांनी या दिवशी भोलेनाथाचा रुद्राभिषेक करावा, सर्व दोष दूर होतील.
महाशिवरात्राचा मुहूर्त
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ 18 फेब्रुवारी रोजी रात्री 08 वाजून 03 मिनिटांनी होत आहे, तर माघ वद्य चतुर्दशी समाप्ती 19 फेब्रुवारी रोजी सायं 4 वाजून 19 मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आहे.
महाशिवरात्रीला उपाय
शिवाचा महिमा अनन्यसाधारण आहे. देवी, देवता, मानव, भोलेनाथ यांची पूजा करणारे गंधर्व, दानव, भूत, या सर्वांचा आशीर्वाद येथे लाभला आहे. असे म्हणतात की, महाशिवरात्रीला शिवलिंगाला दुधाने अभिषेक करा. असे केल्याने पितृदोष, गृहदोष असे सर्व दोष दूर होतात, असे मानले जाते. या दरम्यान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करा. या दिवशी निशीथ काळातील शिवलिंगाची पूजा फार फलदायी असते.
महाशिवरात्री 2023: या राशींचे भाग्य चमकेल
मेष - या वर्षी मेष राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला भगवान शंकराची विशेष कृपा लाभेल. व्यापारी वर्गातील लोकांना आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल. कुटुंबात समृद्धी येईल.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला पंचामृताने अभिषेक करावा. यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल. गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ - महाशिवरात्रीच्या दिवशी शनि कुंभ राशीत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. अविवाहितांचे लग्न होण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणांहून पैसे मिळतील.
निशीथ काल वेळ
निशीथकाल 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 51 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी रात्री 1.17 वाजेपर्यंत असणार आहे.
पहिला प्रहर : 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6.41 ते रात्री 9.47 वाजेपर्यंत
दुसरा प्रहर : रात्री 9.47 ते 12.53 वाजेपर्यंत
तिसरा प्रहर : 19 फेब्रुवारी, दुपारी 12.53 ते 3.58 वाजेपर्यंत
चौथा प्रहर : 19 फेब्रुवारी, पहाटे 3.58 ते 7.07 वाजेपर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Mahashivratri 2023 : यंदाची महाशिवरात्र अत्यंत खास! विविध दुर्मिळ योगायोग, मनोकामना होतील पूर्ण