एक्स्प्लोर

Mahashivratri 2023 : यंदाची महाशिवरात्र अत्यंत खास! विविध दुर्मिळ योगायोग, मनोकामना होतील पूर्ण 

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग होणार आहे. या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शनिदोषही दूर होईल. जाणून घ्या

Mahashivratri 2023 : महाशिवरात्री (Mahashivratri) ही दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. 2023 नवीन वर्षात 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी करणार आहोत. या दिवशी भगवान शिव- पार्वतीची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची महाशिवरात्री आणखी खास असेल, कारण या दिवशी शनि प्रदोषासह अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत. महाशिवरात्रीला शनि प्रदोष येणे हा एक दुर्मिळ योगायोग मानला जातो, जो शनिदोष दूर करण्यात खूप प्रभावी आहे. शनि प्रदोष सोबत इतर कोणते शुभ योग तयार होत आहेत? जाणून घ्या


अनेक दुर्मिळ योगायोग
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग होणार आहे. 18 फेब्रुवारीला शनि प्रदोष असल्याने महाशिवरात्रीसोबतच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शनिदोषही दूर होईल. या वेळी महाशिवरात्रीला शनि प्रदोष व्यतिरिक्त अशा अनेक शुभ घटना घडत आहेत. ज्यामध्ये भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि उपवास करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. हे शुभ योग कोणते आहेत ते पाहूया.


महाशिवरात्रीला शनि प्रदोष योग
महाशिवरात्रीसह शनि प्रदोषा धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातोय. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शनि प्रदोष व्रत पाळले जाते. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनि प्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात. यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते. महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाला अभिषेक केल्याने शनीच्या महादशापासून आराम मिळेल.


महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग
महाशिवरात्रीला संध्याकाळी 5.42 ते 19 फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून व्रत ठेवल्याने तुम्हाला यश मिळते. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्य सिद्धीसाठी विशेष शुभ मानला जातो. या शुभ योगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नवीन काम सुरू केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते.


महाशिवरात्रीला कुंभ राशीतील शनी 
या वेळी महाशिवरात्रीला शनीही कुंभ राशीत राहील आणि 13 फेब्रुवारीला सूर्यही कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीला पिता-पुत्र, सूर्य आणि शनि एकाच राशीत असतील. ज्योतिषशास्त्रात पिता-पुत्र सूर्य-शनि यांचे परस्पर विरोधी संबंध मानले जातात. असे असूनही या राशीत ते शुभ आणि फलदायी असतील. यावेळी शनि वक्री अवस्थेत असेल. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. या शुभ योगात शिवाची उपासना आणि उपवास केल्याने शनिदेवाचे सर्व दोष दूर होतात.


महाशिवरात्रीला मीन राशीतील गुरु
महाशिवरात्रीला गुरू देखील आपल्या राशीत मीन राशीत असेल. बृहस्पति मीन राशीत उच्च आहे आणि जेव्हा तो स्वतःच्या राशीत असेल तेव्हा तो हंसराज योग तयार करेल. करिअरच्या दृष्टिकोनातून ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी तुम्ही तुमच्या करिअरबाबत जो काही निर्णय घ्याल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन नोकरीसाठी कुठे जात असाल किंवा नोकरीच्या संदर्भात मुलाखतीसाठी जात असाल तर तुम्हाला शिवतांडव स्तोत्राचा पाठ करून यश नक्कीच मिळेल.


महाशिवरात्रीला मीन राशीत शुक्र 
महाशिवरात्रीला गुरूसोबत शुक्रही मीन राशीत असेल. ज्योतिष शास्त्रात दोन्ही ग्रह विरोधी स्वभावाचे मानले जातात, पण चांगली गोष्ट म्हणजे शुक्र मीन राशीत उच्च स्थानी असेल. त्यामुळे मालव्य नावाचा शुभ राजयोग तयार होईल. या सर्व शुभ परिस्थितीत भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजवर ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या, ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील.

 

महाशिवरात्रीचे शुभ मुहूर्त कोणते?

महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. यंदा एक खास योगायोग तयार झाला आहे. त्यामुळे ही महाशिवरात्र खास असणार आहे. 2023 सालच्या महाशिवरात्रीच्याच दिवशी शनिप्रदोष व्रत देखील येत आहे. त्यामुळेच यंदाची महाशिवरात्र अत्यंत खास असणार आहे. शास्त्रानुसार महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथी 18 फेब्रुवारी रोजी रात्री 8.03 वाजता सुरू होईल आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4.19 वाजता समाप्त होईल. निशीथ कालात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं. निशीथ काल 18 फेब्रुवारीला असल्याने या दिवशी महाशिवरात्र साजरी होणार आहे.

निशीथ काल वेळ

निशीथकाल 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 51 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी रात्री 1.17 वाजेपर्यंत असणार आहे.

पहिला प्रहर : 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6.41 ते रात्री 9.47 वाजेपर्यंत

दुसरा प्रहर : रात्री 9.47 ते 12.53 वाजेपर्यंत

तिसरा प्रहर : 19 फेब्रुवारी, दुपारी 12.53 ते 3.58 वाजेपर्यंत

चौथा प्रहर : 19 फेब्रुवारी, पहाटे 3.58 ते 7.07 वाजेपर्यंत

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

February Career Horoscope 2023: फेब्रुवारीत या 4 राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता, जाणून घ्या

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget